पुणे : जिल्ह्यातील इंदापूर इथं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अन्ना का सत्याग्रह जनसभा आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र अण्णांच्या या सभेला फारसा प्रतिसाद लाभला नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भ्रष्टाचारी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव इंदापुरात दाखल झाले होते. मात्र सभेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून अण्णा आपली नाराजी लपवू शकले नाहीत.
अण्णा हजारे यांनी यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधात आणि लोकपालसाठी जोरदार आंदोलन केलं होतं, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात दिल्लीत गर्दी होत होती.