भिडे हे जाती-धर्मात तेढ निर्माण करतात - माजी महापौर विवेक कांबळे

असा आरोप सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांनी केला आहे. 

Updated: Jan 8, 2018, 10:36 AM IST
भिडे हे जाती-धर्मात तेढ निर्माण करतात - माजी महापौर विवेक कांबळे title=

सांगली : अ‍ॅट्रॉसिटीला कायदयाला विरोध करणाऱ्या ‘संभाजी भिडेंचा मनुवादी चेहरा अखेर उघड’ झाला असून, भिडे हे जाती-धर्मात तेढ निर्माण करत असून बहुजनांच्या तरुणांची माथी भडकवतात, असा आरोप सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांनी केला आहे. 

सांगलीत बहुजन संघटनांचा मोर्चा

मिरज येथे कांबळे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर लवकर कारवाई करावी. या मागणीसाठी आज सांगलीमध्ये बहुजन संघटनांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विविध समाज बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती ही माजी महापौर विवेक कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजी दलित विरोधी नसल्याचं, शिवप्रतिष्ठाननं म्हटलं आहे.

बाहेरील शक्ती कोण? - शरद पवार

भीमा कोरेगाव प्रकरणात बाहेरील शक्ती कोण होत्या याचा शोध सरकारनं घ्यावा. हे वातावरण कुणी तयार केलं..त्याचबरोबर अशा प्रकारचं वातावरण ब-याच दिवसांपासून असण्याची शक्यता शरद पवारांनी व्यक्त केलीये.. सोलापुरातील अकलूजमध्ये सहकार महर्षी शकंरराव मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते...त्याचबरोबर केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि करप्रणालीमुळे देशाचा विकास दर घटल्यानं देश कठीण परिस्थितीतून जात असल्याचही त्यांनी यावेळी म्हंटलंय..