नवी मुंबई : मेक इन इंडियाच्या धोरणामुळे कोकणची राख होणार असून गुजरातमध्ये मात्र विकासाची रांगोळी काढली आहे, असा विकास शिवसेना मुळीच सहन करणार नसल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशी येथे केलं.
उद्धव ठाकरे वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सचिनदादा धर्माधिकारी यांना नव उद्योग निर्माण गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
यावेळी उद्धव ठाकरेंना सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘मेक इन इंडियाच्या नावाखाली आपल्याला सध्या विकासाची स्वप्ने दाखविली जात आहेत. जे चांगले आहे, ते सर्व भकास आणि नष्ट होणार असेल तर याला विकासाची स्वप्न म्हणता येणार नाही. कोकणाचा विकास करताना येथील पर्यावरणाचा -हास होत असल्याची खंत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.