VIRAL VIDEO : त्याने घराचा दरवाजा उघडला आणि...निशब्द करणारा या व्हिडीओला 17.4 दशलक्ष व्ह्यूज

Viral Video :  नेहमीप्रमाणे तो घरी आला आणि चाबीने त्याने घराचे दरवाजा उघडला, पण डोळ्यासमोर जे चित्र पाहिलं ते त्याला निशब्द करणारं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला 17.4 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Feb 1, 2025, 07:37 PM IST
VIRAL VIDEO : त्याने घराचा दरवाजा उघडला आणि...निशब्द करणारा या व्हिडीओला 17.4 दशलक्ष व्ह्यूज title=
viral video

Viral Video :  सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. या प्लॅटफॉर्मवर असंख्य व्हिडीओ क्षणाक्षणाला व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही सत्य घटनांवर आधारीत असतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 17.4 दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही निशब्द होत आहेत. धडकी भरणारा व्हिडीओ प्रत्येकाचा काही सेकंदासाठी श्वास रोखणारा आहे. हा व्हिडीओ पाहून समजतं की, आयुष्यात कुठल्या क्षणी काय अनपेक्षित गोष्ट घडले याचा काही नेम असता. धानीमनी असतानाही त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकते. 

X वर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस घराकडे परतो. त्याने स्वप्नातही विचार केला नसेल असं दृष्य होत घराच दरवाजा उघडताच पाहता. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा हात दिसतोय, तो चाबीने घराचा दरवाजा उघडतो. हलकाच दरवाजा उघडता क्षणी समोरील जे पाहतो तो भयभीत होतो. कारण त्या दारामागे वाघ होता. जसा तो वाघ दरवाजाकडे सरकतो तो क्षणात दरवाजा लावून घेतो. या व्हिडीओला 17.4 दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत, वापरकर्त्यांनी विनोदीपणे मागच्या दाराचा वापर करण्यापासून, वाघाला चहासाठी आमंत्रित करण्यापर्यंत विविध प्रतिक्रिया सुचवल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये एक माणूस दरवाजा उघडताना दिसतोय. तो दरवाजा थोडासा उघडतो तेव्हा त्याला त्याच्या जवळ एक वाघ दिसतो. तो दरवाजा थोडासाच उडतो आणि त्याला वाघाचे डोळे दिसतात. वाघही त्या माणसाकडे पाहताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'कल्पना करा की तुम्ही तुमचा दरवाजा उघडला आणि तुम्हाला हे दिसेल... तुम्ही काय कराल?' 

इंटरनेट प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने विनोदाने असे सुचवलंय की, माणसाने फक्त मागच्या दाराने निघून जावे, कारण ते आता व्यावहारिकरित्या वाघाचे घर आहे. दुसऱ्या लिहिलंय की, त्याला चहासाठी आमंत्रित करण्याबद्दल विनोद केला, तर तिसरा म्हणतोय की, तीव्र डोळ्यांच्या संपर्काकडे लक्ष वेधले आणि दरवाजा लॉक करून गायब होण्याची शपथ घेतली. काहींनी त्याच्या हातावरील जखमेकडे लक्ष वेधले आणि असे सुचवले की ही वारंवार घटना असू शकते ही. काही असो अनपेक्षित अशी घटना आपल्यासोबत झाली तर...विचारही करु शकत नाही ना?