बॉलिवूडपासून ते साऊथ सिनेमापर्यंत काही प्रेमकथा अशा आहेत की ज्यांची कथा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. यामधील काही कथा खरोखरच काल्पनिक वाटतात. कुणी ऐकलं तर लोक एवढंच म्हणतील की, अरे, असपण असते. आज आपण अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. अतिशय सुंदर आणि तितकीच कुशल असल्यामुळे तिला एकापाठोपाठ एक चित्रपट मिळत राहिले. ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली. या अभिनेत्रीची प्रेमकहाणी अशी आहे की त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने एकदा नाही तर दोन वेळा लग्न केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने दोन्ही लग्न कुटुंबाच्या विरोधात जावून केली. ज्यामध्ये तिने सुरुवातिला बिझनेसमनसोबत लग्न केले तर दुसरे 27 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तिला तिने जीवनसाथी बनवले.
तरुण वयात पडली होती बिझनेसमनच्या प्रेमात
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका कुमारस्वामी आहे. राधिकाने वयाच्या 14 व्या वर्षी 'नीनागागी' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळी ती 9 वीमध्ये शिकत होती. अभिनेत्री राधिकाला 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नीला मेघा शामा' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली होती.2003 मध्ये ती 'इयारकाई' चित्रपटात दिसली होती.
कमी वयातच ती बिझनेसमन रतन कुमारच्या प्रेमात पडली होती. पण कुटुंबीय तिच्या लग्नासाठी तयार नव्हते. म्हणून दोघांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केले. परंतु, हे लग्न फार काळ टिकले नाही. रतन कुमारने राधिकाच्या वडिलांविरोधात तक्रार दिली. राधिकाचे करिअरवर परिणाम होऊ नये यासाठी त्याने तिचे अपहरण केल्याचं म्हटलं. मात्र, वाद वाढल्यानंतर राधिकाच्या आईने रतन कुमारवर मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याचा आरोप केला. यादरम्यान, रतन कुमार यांचा हॉर्ट अटॅकमुळे निधन झाले.
नंतर 27 वर्षांनी मोठ्या नेत्यासोबत थाटला संसार
त्यानंतर राधिका एकटी पडली. ती पुन्हा तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नेत्याच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्नही केलं. तिने एचडी कुमारस्वामींशी लग्न केलं होतं. लग्न केल्याची माहिती चार वर्षे कोणालाही माहिती नव्हती. राधिका ही एचडी कुमारस्वामी यांच्या पेक्षा 27 वर्षांनी लहान होती. राधिका आणि कुमारस्वामी यांचे हे दुसरे लग्न होते. लग्नाची माहिती समजल्यावर तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता. कुमारस्वामी 2018-19 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. आता राधिका 124 कोटींची मालकीण आहे. दोघांना एक मुलगी आहे.