दुर्मिळ खजिना मिळवण्यासाठी चीनने छोटा देश पोखरुन काढला; भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले

चीनने दुर्मिळ खजिना शोधण्यासाठी एक छोटा देश पोखरुन काढला आहे. चीनच्या या भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Feb 1, 2025, 10:16 PM IST
दुर्मिळ खजिना मिळवण्यासाठी चीनने छोटा देश पोखरुन काढला; भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले title=

China Discovers 20 Million Tons Of Copper In Tibet  :   चीनने तिबेटसारखा छोटा देश पोखरुन दुर्मिळ खजिना शोधला आहे. चीनच्या या भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले आहेत. हा खजाना शोधून आपल्या शक्तीने तिबेटवर वर्चस्व गाजवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. मात्र, चीनने तिबेटमध्ये केलेल्या उत्खननामुळे तिबेटचे पर्यावरणच धोक्यात आले आहे. तिबेटमध्ये चीनला जो दुर्मिळ खजाना सापडला आहे तो चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरणार आहे. 

चीनला तिबेटमध्ये सापडलेला हा दुर्मिळ खजिना म्हणजे तांबे धातूचा साठा आहे.  तिबेटच्या चार प्रदेशात तांब्याचे प्रचंड साठे सापडले आहेत. युलोंग, डुओलोंग, जुलोंग-जियामा आणि झिओंग्नु-झुनू या भागात या तांबे धातुची खाण सापडली आहे. 
चीनने या भागांचे पूर्वीपासूनच शोषण केले आहे. तिबेटमधील चामडो शहरातील युलोंग साइटवर आधीपासूनच चीनचा दुसरा सर्वात मोठा तांब्याचा साठा आहे. ज्यामुळे  तांबे उत्खननासाठी हे महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. या नवीन शोधामुळे तिबेट जगातील सर्वात मोठा तांबे उत्पादक प्रदेश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. माैत्र, या शोधामुळे जागतिक पुरवठा साखळीवर चीनचे नियंत्रण वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

मागील काही वर्षात जगात तांब्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये तांब्याची मागणी खूप जास्त आहे. त्याच वेळी, नूतनीकरणक्षम ऊर्जा तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या जलद वाढीमुळे, जगातील तांब्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. चीनच्या हाती लागलेल्या या खजानामुळे चीनचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल. 

इलेक्ट्रिक ग्रिड, बॅटरीचे उत्पादन आणि प्रगत औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी तांब्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे जगातील ज्या देशांना आपले उत्पादन वाढवायचे आहे, त्यांनी तांबे शोधण्याची शर्यत सुरू केली आहे. अशातच चीनने आपल्या सर्वा शक्तीचा वापर करत एक छोटा देश पोखरुन हा दुर्मिळ खजिना मिळवला आहे. 

चीनमध्ये तसेच जगभरातील अक्षय ऊर्जा आणि विद्युतीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि चीनचे बहुतांश महत्त्वाकांक्षी प्रकल्प तांब्याच्या मुबलक पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. पवन टर्बाइन, सौर पॅनेल, पॉवर ग्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये तांबे देखील एक महत्त्वाचा घटक आहे. हे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यात खूप मदत करते. त्यामुळे या नवीन शोधामुळे चीनकडे देशांतर्गत तांब्याचा एवढा मोठा साठा खुला झाला आहे, ज्यातून तो जागतिक पुरवठा साखळी नियंत्रित करू शकतो. चीन तांब्यासाठी चिली, पेरू आणि काँगो प्रजासत्ताक यांसारख्या देशांवर अवलंबून आहे आणि या नवीन शोधामुळे चीनचे या देशांवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होणार आहे. याशिवाय तांब्याच्या शोधामुळे चिनी उत्पादनांच्या किमती आणखी कमी होतील, कारण तो कच्चा माल आपल्याच देशातून कमी किमतीत पुरवू शकणार आहे.

जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) प्रकल्प आधीच राबवत आहे.  या प्रकल्पातही तांब्याचा शोध महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांतर्गत चीन आशिया तसेच आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारत असून तांब्याचा शोध या प्रकल्पांसाठीही वरदान ठरणार आहे.  तांब्याच्या शोधाचा तिबेटवर गंभीर परिणाम झाला आहे. किंघाई-तिबेट पठार हा जगातील सर्वात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशांपैकी एक आहे, येथे अद्वितीय जैवविविधता आणि नाजूक पर्यावरणीय प्रणाली आहेत. जर चीन या प्रदेशात उत्खणन करत राहिले तर पर्यावरणाचा नाश होईल.