Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती

Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील आतापर्यंतचा घटनाक्रम....   

Updated: Jan 6, 2025, 08:22 AM IST
Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती title=
Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case chronology of what and when happened

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : संपूर्ण राज्याला हादलवणाऱ्या प्रकरणात आता नवी बातमी समोर आली असून, या हत्येचं भिवंडी कनेक्शनही हादरवणारं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पुढील प्रमाणे. (Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case)

6 डिसेंबर रोजी आवादा कंपनीच्या आवारात मारहाणीची घटना घडली.

9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची केज मांजरसुंबा रोडवरील टोलनाक्या जवळून अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर अपहरणाचा, हत्येचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला.

10 डिसेंबर रोजी पुरवणी जबाबात सात आरोपींची नावे घेण्यात आली. यात. 1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे 5)सुदर्शन घुले 6)सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली.  कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. .. खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड त्यालाही अटक करण्यात आली. 

घटनाक्रम पुढीलप्रमाणे...

  • 9 डिसेंबर रोजी तीन वाजता अपहरण करत 7 वाजता हत्या झाल्याचं वृत्त समोर आलं. 
  • 9 डिसेंबर रोजी रात्रभर ग्रामस्थ केज  मांजरसुंबा रोडवर ठिय्या देऊन बसले होते.
  • 10 दहा डिसेंबर रोजी सकाळपासून पुन्हा ग्रामस्थांनी रोडवर ठिय्या आंदोलन केले. 
  • जरांगे पाटलांची देशमुख कुटुंबाची भेट आंदोलनात ठिय्या. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी करण्यात आली होती ती मान्य करण्यात आली. पुढे या प्रकरणातील दोन आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून केली अटक..
  • सायंकाळच्या वेळी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केला यानंतर 11 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
  • 10 डिसेंबरला रात्री दोन वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
  •  11 डिसेंबरला केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आणि वाल्मीक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
  • या प्रकरणात पोलिसांनी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले , विष्णू चाटे यांना आतापर्यंत अटक करण्यात आली. 
  • सीआयडी चे महासंचालक प्रशांत बुर्डे दोन दिवसांपासून बीडमध्ये ठाण मांडून.
  • सीआयडीकडे गुन्हा वर्ग केल्यानंतर सीआयडीचे महा संचालक, स्वतः बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले. 
  • नवीन पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच घेतली देशमुख कुटुंबाची भेट. पुढे सीआयडी चे वरिष्ठमहासंचालक थेट केज मध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन चौकशी केल्याची माहिती आहे. 
  • चार तास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक पार पडली.
  • केज पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले 9 डिसेंबर चे सर्व सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात.
  • सलग दुसऱ्या दिवशी देखील सीआयडी चे महा संचालक बीडमध्ये दाखल प्रशांत बोर्डे दुसऱ्या दिवशी बीडच्या शहर पोलीस स्टेशन मध्ये पोहचले त्यांनी आरोपी विष्णू चाटे याची एक तास चौकशी केल्याची माहिती अटकेत असलेल्या इतर आरोपींचीही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्याची माहिती.
  • ॲट्रॉसिटी प्रकरण, खंडणी प्रकरण ,आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडी कडे वर्ग. 
  • 27 तारखेला वाल्मिक कराड यांच्या पत्नी कराड यांची सीआयडी कडून तीन तास पासून चौकशी. याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी. 
  • आरोपीच्या अटकेसाठी 28 तारखेला आक्रोश मोर्चा मोर्चा.
  • आतापर्यंत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीचे मंजली कराड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दोन अंगरक्षक,राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, यांच्यासह आणखी चार ते पाच महिलांची सीआयडीने चौकशी केली आहे. तसेच केज 50 ते 60 व्यक्तींची चौकशी केल्याचे देखील माहिती आहे.

हेसुद्धा वाचा : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन समोर, मित्राला शोधत आले पण...

 

आरोपी शरण... 

  • खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये शरण आला. 
  • केज कोर्टामध्ये त्याला हजर केलं असता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 
  • सर्व पथके उर्वरित तीन आरोपीच्या शोधासाठी कामाला लागले. चार जानेवारीला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.त्यांच्या सोबतच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली त्यावेळी लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील अटक केली. 
  • 1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे या चार आरोपींना 5) सुदर्शन घुले, 6) सुधीर सांगळे हे अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.
  • 2)खंडणीच्या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे आरोपी आहेत. खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी अटकेत. त लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे हा देखील अटकेत आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये आठ जणांना अटक करण्यात आली असून, सदर प्रकरणी यंत्रणांनी तपासाला वेग देत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.