पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी सोन्याच्या दुकानात लूट

पुणे ISIS दहशतवादी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी  टेरर फंडिंगसाठी सोन्याच्या दुकानात लूटले होते. 

Updated: Mar 13, 2024, 03:34 PM IST
पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी सोन्याच्या दुकानात लूट title=

Pune Crime News : पुण्यातील ISIS दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट समो आली आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडले होते. या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील सोन्याचे दुकान लुटलं होतं अशा कबुली या दहशवाद्यांनी दिली आहे. 

टेरर फंडिंग साठी या दहशतवाद्यांनी एका सोन्याच्या दुकानात लूट केली होती.  सोन्याच्या दुकानातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केले होती.  दहशतवाद्यांनी ही रक्कम टेरर फंडिंग साठी वापरली होती. एटीएसने केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी अशी  या  दहशतवाद्यांची नावे आहेत. या दोघा दहशतवाद्यांना 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा आता पुणे पोलीस तपास करत आहेत. 

देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरून पुण्याच्या कोथरूडमधून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले  होते. त्यांच्या लॅपटॉपमध्ये गोपनीय संशयास्पद माहिती आढळली होती. हे दोघेही कोंढव्यातील राहणारे होते. त्यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. घरात तपासणी केली असता पोलिसांनी त्यांचे लॅपटॉप जप्त केले होते.