10% पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यात नवे निर्देश

पुढीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात आले 

Updated: May 31, 2021, 09:39 AM IST
10% पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यात नवे निर्देश

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ब्रेक द चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगितले. मात्र पुढील लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र नियम एकसारखे न ठेवता काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये 10% पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यात नवे निर्देश लावण्यात आले आहेत. जाणून घेऊया हे बदल 

ज्या पालिका किंवा जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्ह दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल. तसेच उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे पुढीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 

त्याचप्रमाणे आवश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुकाने 7 ते 11 या वेळेऐवजी आता 7 ते 2 वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र शनिवार, रविवारी सगी दुकाने बंद राहतील. 

तसेच आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्सच्या माध्यमातून वितरित करण्यास परवानगी आहे. दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. 

कोरोनाविष्यक कामे करणाऱ्या कार्यलयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. कृषिविषयक सर्व दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. 

20% पेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी दर असल्यास काय असणार निर्बंध 

या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कुणा एकाही व्यक्तीला जिल्ह्याच्या बाहेर अथवा आत जाण्याची परवानगी नाही. 

राज्याचा जिल्हा पॉझिटिव्हिटी सरासरी रेट 10.46% आहे. हा आहे जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर 

अहमदनगर 9.98%
वर्धा 9.92%
वाशीम 9.81% 
लातूर 9.26% 
बुलढाणा 8.99%
सोलपूर 8.91%
पालघर 8.43%
नाशिक 8.11%
परभणी 8.04%
नागपूर 736%
मुंबई 6.66%
यवतमाळ 6.59% 
औरंगाबाद 6.42% 
चंद्रपूर 5.70%
जालना 5.26%
धुळे 4.83%
नांदेड 4.50%
भंडारा 4.35%
नंदुरबार 4.20% 
गोंदिया 3.69%
जळगाव 3.41%