LIVE UPDATE : पोटनिवडणुकांचे निकाल

पाहा राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 14, 2017, 04:02 PM IST
LIVE UPDATE : पोटनिवडणुकांचे निकाल  title=

शिवसेना नेते यांची ठाणे जिल्हा परिषद विजयावर प्रतिक्रिया

ठाणे जिल्हापरिषदेतील यश शिवसैनिकांचे, त्याच्या मेहनतीचे आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाचे यश आहे-
एकनाथ शिंदे

पहिल्यांदाच ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे
- भाजपाचे स्थानिक आमदार, खासदार यांच्याविरुद्ध असलेला राग या निवडणुकीत मतदारांनी दाखवला-
एकनाथ शिंदे

**********************

ठाणे जिल्हा परिषद 
जिल्हा परिषदेतील  25 गटात  शिवसेना तर 9  गटात राष्ट्रवादी  विजयी ,  सेना- राष्ट्रवादी युतीने 
बहुमतासाठी  लागणारा 27 चा आकडा केला पार

शिंदखेडा न.पं.भाजपा  नगराध्यक्ष  3333 मतांनी विजय
 
17 पैकी 9 नगरसेवक  भाजपा

शिंदखेडा निकाल
नगराध्यक्ष-सौ.रजनी अनिल वानखेडे (भाजप)
वार्ड.             नगरसेवक
१-कसबे किसन जगन(भाजप)
२-भिल दिपक दशरथ(काँग्रेस)
३-थोरात संगिता किरण(काँग्रेस)
४-कुरेशी साजीदाबी शेख (सपा)
५-भिल संगिता राजेंद्र(काँग्रेस)
६-राजपूत विजय नथेसिंग(सपा)
७-देसले प्रकाश नागो (भाजप)
८-देसले उदय अरूण(काँग्रेस)
९-चौधरी सुनिल बाजीराव(काँग्रेस)
१०-पाटील योगिता विनोद(भाजप)
११-वानखेडे अनिल लालचंद(भाजप)
१२-जाधव भारती जितेंद्र(भाजप)
१३-मिरा मनोहर पाटील(काँग्रेस)
१४-वंदना चेतन गिरासे(भाजप)
१५-निर्मला युवराज माळी(भाजप)
१६-भिला बारकु माळी(भाजप)
१७-नर्मदा अर्जुन भिल(भाजप)

************************

ठाणे जिल्हा परिषद - आमदार बरोरा यांचा मुलगा आणि बहीण जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी

ठाणे .भाजप खासदार कपिल पाटील यांचा पुतण्या अँजुरफाटा या गटातूंन विजयी .....देवेश पाटील विजयी

*********************

अंबरनाथ- पंचायत समिती, चोण गण - शिवसेनेच्या स्वप्नाली प्रवीण भोईर विजयी  

Zp सेना विजयी आतापर्यंत

शिरावल
गोठेघर
साखरबाव
मोखवाने
आसंनगाव
खोनी
चारगांव
वाड़ी
गणेशपुरी
काम्बे
कारिवली

****

कोल्हापूर - 

हुपरी नगरपालिका निवडणूक 

 अंतिम निकाल 

नगराध्यक्ष पद - भाजपच्या जयश्री गाट विजयी 

* नगरसेवक 18 जागांपैकी जाहीर निकाल 18 
* भाजप - 7
* ताराराणी जिल्हा विकास आघाडी - 5
* मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडी - 2
* शिवसेना - 2 
* अपक्ष - 2

******

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेवर आता पर्यंत 17 जागा जिंकत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. तर, भाजपने 7 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फकणार असल्याचे दिसून येत आहे. 

ठाणे जिल्हा परिषदेच्या 52 गट आणि पंचायत समितीच्या  106 गणांसाठीच्या निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता पर्यंत हाती आलेल्या निकाल नुसार शिवसेनेने 17, भाजपने 7, राष्ट्रवादी काँग्रेसने 4 आणि काँग्रेसने 1 जागा काबीज केला आहेत.  तर, पंचायत समितीच्या शिवसेनेने 31, भाजपने 16, राष्ट्रवादी काँग्रेसने 8 आणि काँग्रेसने 2 जागा काबीज केला आहेत.

***********

आसनगाव गटात भाजपला धक्का

(जिल्हा परिषद) 
आसनगांव गटात सेनेचे मधुकर चंदे यांचा  विजय 
भाजपच्या भगवान चंदे यांचा 23 मतांनी निसटता पराभव
(पंचायत समिती)सेनेच्या रेश्मा परमेश्वर मेमाणे 173 मतांनी विजयी.
भाजपच्या पुष्पा रामचंद्र मुंडे पराभूत

*******

शहापुर तालुक्यातील शिरोळ गट शिवसेना पक्ष 3 ही उमेदवार विजयी जि.प.देवराम भगत पं.च.शिरोळ गण राजाराम कामडी खडीँ गण रेणुका बोरकर

*********

ठाणे जिल्हा परिषद - 38 शेलार गण मतदार यादीतील घोळ आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तेथील मतमोजणी होणार नाही. तसेच त्याठिकाणी फेर निवडणूक होणार आहे.

********

मुंबई महापालिका पोटनिवडणूक वॉर्ड नं 21( कांदीवली) मधून भाजपा उमेदवार प्रतिभा योगेश गिरकर यांचा ७१२२ मतांनी विजय. काँग्रेस उमेदवाराला केले पराभूत. भाजपच्या शैलजा गिरकर यांच्या मृत्यूनंतर लागली होती पोटनिवडणूक

********