फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अवैध दारू करणारी गाडी ताब्यात

राज्यात हायवे वरील दारु बंद झाल्या नंतर  मोठया प्रमाणात अवैध्य रीत्या दारुची विक्री आणि वाहतूक होतांना आढळून येतय. आज संगमनेर पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत अवैध्य दारू विक्री करणारी एक स्कॉर्पिओ गाडी पकडली आहे. ही गाडी पळून जात असतांना गाडीचा अपघातही झाला असून यात चार जण जखमी झालेत तर पोलीसांनी अवैध्य दारू वाहतूक करणा-या दोघांना ताब्यात घेतल आहे. 

Updated: Jun 22, 2017, 08:34 PM IST
 फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अवैध दारू करणारी गाडी ताब्यात  title=

संगमनेर : राज्यात हायवे वरील दारु बंद झाल्या नंतर  मोठया प्रमाणात अवैध्य रीत्या दारुची विक्री आणि वाहतूक होतांना आढळून येतय. आज संगमनेर पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत अवैध्य दारू विक्री करणारी एक स्कॉर्पिओ गाडी पकडली आहे. ही गाडी पळून जात असतांना गाडीचा अपघातही झाला असून यात चार जण जखमी झालेत तर पोलीसांनी अवैध्य दारू वाहतूक करणा-या दोघांना ताब्यात घेतल आहे. 

 
अहमदनगर पोलीसांना आज गुप्त माहीती नुसार नाशिक पुणे हायवेवरून आक्षेपार्ह वस्तू एका  स्कॉर्पिओ गाडीतून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या नंतर पुणे-नाशिक महामार्गावर पोलीसांनी गस्त सुरू केली असतांना एक काळी गाडी  संगमनेर शहराच्या दिशेने जात असताना आढळून आली पोलीसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला.  हे स्कॉर्पिओच्या चालकाच्या लक्षात येताच गाडीचा वेग वाढवीला गेला शहरातुन गाडी पळवता येत नसल्याने स्कॉर्पिओचालकाने गाडी पुन्हा महामार्गाकडे भरधाव नेली  मात्र महामार्गावर जाताच चालकाने विरुद्ध दिशेने गाडी चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात समोरून येणाऱ्या पिकअप  या गाडीची सामोरासमोर धडक बसल्याने चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला या अपघातात दोन्ही गाड्यांची नुकसान झाल असून  पिकअप मधील दोनजण जखमी झाले आहेत. 
 
अपघातानंतर पोलीसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मद्य साठा पोलीसांना आढळून आला आहे. त्याच बरोबरीने गाडीत MH-०९ D-०३७३ या नंबरची प्लेट सापडली आहे पोलिसांनी गाडीतून निवृत्ती घुले, जालिंदर भाबड या दोन जणांना ताब्यात घेतले असून गाडीजप्त करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.