कारची बाईकला भीषण धडक, दुचाकीस्वार हवेत उडाला, ५० ते ६० फूट उंच फेकला गेला

Accident In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 3, 2023, 12:22 PM IST
 कारची बाईकला भीषण धडक, दुचाकीस्वार हवेत उडाला, ५० ते ६० फूट उंच फेकला गेला title=
car and bike accident in Chhatrapati Sambhaji Nagar Accident one died

Accident In Chhatrapati Sambhajinagar: वैजापूर शहरात एक धडकी भरवणारा अपघात समोर आला आहे. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की दुचाकीस्वार ५० ते ६० फूटवर उडाला. तर मोटारसायकल १०० फूट फरफटत गेली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Car Bike Accident CCTV Video)

दुचाकीस्वार जागीच ठार

वैजापूर शहरातील जीवनगंगा गेटसमोर भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार ५० ते ६० फुट वर उडून खाली कोसळला. तर अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची मोटरसायकल १०० फुट फरफटत गेली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघाताची भीषण दृष्ये पाहून अंगाचा थरकाप उडाला आहे.

अपघात सीसीटीव्हीत कैद

संभाजीनगरकडून येणाऱ्या कारने जीवनगंगा गेटसमोर दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. सुरेश सुप्पडसिंग चरवंडे असं दुचाकीस्वाराचे नाव आहे. कारच्या धडकेत ते जागीच ठार झाले आहेत.दुचाकीस्वार सुरेश चरवंडे हे रस्ता क्रॉसकरुन पलीकडे येत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव  कारने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर कार त्याचवेगात पुढे निघून गेली, असं व्हिडिओत दिसत आहे. 

भीषण! एकाच ठिकाणी धडकल्या तीन रेल्वेगाड्या; ओडिशातील भयाण अपघाताचं खरं कारण समोर

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे का, याची अद्याप माहिती मिळाली नाहीये. 

धाराशिव येथे एसटीचा अपघात

धाराशिव जिल्ह्यातील परंडा बार्शी रस्त्यावर सोनगिरी पुलाजवळ एसटी बसचा अपघात झाला आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात सत्तावीस प्रवासी जखमी झाले असून यापैकी चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना परंडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांना बार्शी येथील खाजगी दवाखान्यामध्ये रेफर करण्यात आले आहे.

ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव, रेल्वे मंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा

चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

परांडा डेपोची बस सकाळी साडे आठच्या सुमारास परांड्याहून बार्शीला जात होती. सोनगिरी पुलाच्या जवळ वळण घेताना ही बस पलटी झाली. सोनगिरी पुलाच्या वळणाजवळ पाठीमागून अचानक एक वाहन आल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस वळणावर पलटी झाली आहे. 

Coromandel Train Accident : कोरोमंडल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर