नाशिक : नाशिक जिल्हा रूग्णालयात बालमृत्यू थांबलेले नाहीत. १८७ बालमृत्यू उघड झाल्यावर आरोग्य यंत्रणा हादरली तरीही मृत्यू सुरूच आहेत.
हरसूल भागातील हेमलता कहाडोळ या महिलेची ग्रामीण रूग्णालयात प्रसुती झाली. ३२ आठवड्यांत बाळ जन्माला आल्याने बाळाची वाढ अपूर्ण होती. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयाने जिल्हा रूग्णालयात बाळाला दाखल केलं.
मात्र, जिल्हा रूग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने दुसऱ्या रूग्णालयात बाळाला हलवण्याचा सूचना करण्यात आल्या. या कालावधीत बाळाची हेळसांड झाली आणि जग पाहण्याआधीच बाळाने जगाचा निरोप घेतला.
१८७ बालमृत्यूंनंतर मंत्र्यांचे दौरे झाले, आश्वासनांची खैरात झाली. चर्चा झडल्या, पण बालमृत्यू थांबवण्यात अजूनही कोणालाही यश आलेलं नाही.