भाजप आमदाराविरोधात कंत्राटदाराची पोलिसांमध्ये तक्रार

यवतमाळचे आर्णी-केळापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. 

Updated: Sep 11, 2017, 09:46 PM IST
भाजप आमदाराविरोधात कंत्राटदाराची पोलिसांमध्ये तक्रार

यवतमाळ : यवतमाळचे आर्णी-केळापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली.

आमदार तोडसाम आणि कंत्राटदार शर्मा यांच्यातील टक्केवारीच्या व्यवहाराची संभाषण क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शर्मांनी पोलिसात तक्रार दाखल करून आमदार तोडसाम यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

तोडसाम यांच्याविरुद्ध तत्काळ एफआयआर नोंदविण्याची मागणी कंत्राटदारांनी केली. यावेळी पुरावा म्हणून तोडसाम यांनी शर्मा यांच्याशी केलेल्या मोबाईल संभाषणाची सीडीही पोलिसांना सादर केली.

कंत्राटदारांनी आता एकजूट करून लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीविरोधात एल्गार पुकारला असून पोलीस आमदार तोडसाम यांच्याविरुद्ध काय कारवाई करतात याकडं राजकीय वर्तुळातून लक्ष लागलेले आहे.