मुंबई : राज्यात 24 तासांत 66 हजार 159 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 771 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 70 हजार 301 रूग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून. प्रत्येकाने खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
66,159 new cases, 771 deaths reported in Maharashtra in the last 24 hours; active cases 6,70,301 pic.twitter.com/APpuZ5D2We
— ANI (@ANI) April 29, 2021
तर मुंबईत आज 4 हजार 192 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 82 जणांचा बळी गेला आहे. तर 64 हजार 18 रूग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.
COVID19 | 4,192 fresh cases, 82 deaths reported in Mumbai today; active cases 64,018 pic.twitter.com/Ze45QunFmO
— ANI (@ANI) April 29, 2021
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 835 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12 हजार 734 आहे. तर एका दिवसांत 1 हजार 546 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगावमध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात आज 1 हजार 63 कोरोना बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 120997 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 108129 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 21 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.