नाशिक : निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं नेहमीच म्हणून आपण गणेशाची पूजा करतो. मास्क लावल्याने कोरोना होत नाही. त्यासाठी खबरदारीचे उपाय केले पाहिजेत याचे प्रबोधन करण्यासाठी आता मंदिरे पुढे सरसावले आहेत. सॅनीटायझर आणि मास्क लावून मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पेशवेकालीन नाशिकच्या नवशा गणपतीला मास्क लावण्यात आला आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडलेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे मंदिरांमध्ये भाविकांचे येणंही कमी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवशा गणपती ट्रस्टने भाविकांसाठी सॅनिटायझर्स, कर्मचाऱ्यांसाठी मास्क लावलेत.
कोरोना व्हायरसनं नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष काढणीला आलेत. कोरोनाचा शिरकाव झाल्यास निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या व्हायरसने जिल्ह्यात प्रवेश करु नये यासाठी खास शेतकऱ्यांनी आणि भाविकांनी नवस केला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शिर्डीमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. शिर्डीत रविवारी शहराच्या सीमेला परिक्रमा घालण्यासाठी यात्रा आयोजित करण्यात आली होती. सरकारी आदेश धुडकावत हजारो भाविकांनी या यात्रेला उपस्थिती लावली. लोक मोठ्या संख्येने एकत्र आल्यास एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून या व्हायरसचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व यात्रा, मेळावे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता औरंगाबादमध्ये एक ५९ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२वर पोहचली आहे.