संजय पाटील, झी मीडिया, अलिबाग : राज्यात 2 वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर अखेर शुक्रवारी19 ऑगस्टला मोठ्या उत्साहात दहींहडी (dahi handi 2022) उत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, ठाण्यासह विविध ठिकाणी गोविंदांनी उंचंचउंच मनोरे रचत दहीहंडी फोडल्या. मात्र या सर्व दरम्यान एक अनोख्या दहीहंडीचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. (dahi handi 2022 unique dahi handi on well in kurdus village at alibaug taluka raigad video viral on social media)
साधारणपणे थर रचत दहीहंडी फोडली जाते. मात्र अलिबाग जिल्ह्यातील कुर्डस गावात अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. कुर्डुसमध्ये 40 फुट खोल असलेल्या विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते. आता तुम्ही म्हणाल, विहिरीवर बांधलेली हंडी फोडायची कशी? या प्रश्नातच उत्तर लपलंय. गोविंदा एकावर एक थर न रचता ही हंडी फोडतात.
कुर्डुसमधील देऊळआळीत डबकी आणि माळीण या 2 विहिरींवर दहीहंडी बांधली जाते. त्यानंतर गोविंदा विहिरीच्या कठड्यावर 3-4 गोविंदा उभे राहतात. त्यापैकी एका गोविंदाला हे बाकीचे गोविंदा आपल्या खांद्यावर घेऊन दहींहडीच्या दिशेने थ्रो करतात. अशा प्रकारे हा थरराक आणि भन्नाट दहहींडीचा सण साजरा केला जातो.
अलिबाग तालुक्यातील थरारक दहीहंडी, थर न लावता फोडली जाते हंडी. #Dahihandi2022 #DahiHandifestival #Kurdus #Alibaug pic.twitter.com/rf0FlSDmQu
— Sanjay Patil (@patil23697) August 20, 2022