जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : विवाह सोहळा(wedding ceremony ) म्हणजे प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण. लग्न सोहळ्यामुळे केवळ नवरा नवरीच नाही तर संपूर्ण कुटुंब आनंदात असत. लग्नगाठ बांधल्यानंतर नवी जोडपी सुखी संसाराची स्वप्न पाहतात. मात्र, जिथं लग्न लागलं त्याच मंडपातून नवरदेवाची अंत्ययात्रा काढली गेली. लग्नाच्या साहव्या दिवशीच नवरीचं कुंकू पुसल गेल. ही कुठल्या चित्रपटाची कथा नाही. बारामतीमध्ये(Baramati) ही मन हेलावून टाकणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे.
नवऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ज्या मंडपात लग्न झाले त्याच मंडपात नवरदेवाचा मृतदेह ठेवण्याची वेळ आली. बारामती तालुक्यातील माळेगाव ही घटना घडली. घरामध्ये लग्न कार्याचा आनंद हा वेगळाच असतो हाच आनंद बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या येळे कुटुंबीयांमध्ये ही होता.
मात्र, येळे कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला आहे. नुकतचं लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा राहिलेल्या सचिन उर्फ बबलू येळे याचे आज पहाटे हदयविकाराने निधन झाले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नासाठी घरासमोर येळे कुटुंबाने मंडप उभारला होता आता. या मंडपातच नवऱ्या मुलाचा मृतदेह ठेवण्याची दुर्दैवी वेळ वेळे कुटुंबावर आली.