पिंपरी चिंचवडमध्ये या कारणामुळे पतीकडून पत्नीचा चावा आणि...

पती-पत्नीमध्ये वाद होत नाही, असं दामपत्य या पृथ्वीवर शोधून सापडणार नाही.  

Updated: Dec 22, 2021, 09:19 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये या कारणामुळे पतीकडून पत्नीचा चावा आणि... title=

पिपंरी-चिंचवड | पती-पत्नीमध्ये वाद होत नाही, असं दामपत्य या पृथ्वीवर शोधून सापडणार नाही. पती-पत्नीत कोणत्याही कारणावरुन भांडणं होऊ शकतात, असं आतापर्यंत ऐकलंही आहे आणि कदाचित तुम्ही पाहिलंही असेल. असाच एका जोडप्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की हे प्रकरण थेट पोलीस स्थानकापर्यंत गेलं. हा गंभीर प्रकार पिपंरी चिंचवडमधील भोसरी परिसरात घडला. या पतीचं वय 56 असल्याची माहिती मिळाली आहे. (Dispute between wife and husband in Pimpari Chinchwad due to poor preparation of food)  

भांडण झाल्याचं कारण हे अजब असलं तरी नवं नाही. बायकोने स्वयंपाक नीट केला नाही, या कारणावरुन पती संतापला. या संतापातून त्याने आपल्या पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा घेतला. पतीने घेतलेल्या चाव्यामुळे पत्नी जख्मी झाली.   

या जख्मी झालेल्या महिलेने भोसरी पोलीस स्थानकात धाव घेतली. या संतापलेल्या पत्नीने आपल्या पती विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या नंतर अखेर दोघांमधील वाद मिटल्याचं म्हंटलं जात आहे.