धुळे : शहरातल्या संगोपन बाल रुग्णालयातील एका काही दिवसांच्या बाळाला झोप येत नव्हती, तो सारखा रडत होता, डॉ. अभिनय दराडे यांना त्या छोट्याशा बाळाने कामाला लावलं, डॉक्टरांकडून त्याने गाणी म्हणून घेतली, एक नाही, दोन नाही तर तीन गाणी...तेव्हा ते पाळ शांत झोपलं...
आमच्या NICU मधल्या ९०० ग्राम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती! कालपासून त्याचा ऑक्सिजन निघालाय, दूध प्यायला लागलाय तशी ताकद आलीय त्याला!
मग काय रात्री रडायला सुरुवात!
NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल, इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरुवात केली! रडणं काही थांबेना!
मग त्याला जरा बाहेर आणलं (केबिनमध्ये)आणि गाणं म्हटलं, तसं ते शांत होऊन गाणं ऐकू लागलं, आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं!
इवलंसं आहे पण स्वतःला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं पठ्ठ्याने!
डॉ अभिनय दरवडे
संगोपन बालरुग्णालय, धुळे