Shivsena logo news : राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात महत्त्वाची घडामोड घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena Symbol) अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. त्याचबरोबर आता शिवसेना नाव देखील वापरता येणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संकटात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता मनसेने (MNS) एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेच्या जखमेवरची खपली काढली आहे.
मनसेच्या अधिकृत ट्विटर (MNS Adhikrut) हॅडलवरून एक व्हिडीओ (Video) शेअर करण्यात आलाय. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जुन्या भाषणाचा काही भाग आहे. त्यामध्ये राज ठाकरे म्हणतात, "वारसा हा कोणता असतो?, वारसा हा वास्तूचा नसतो, वारसा हा विचारांचा असतो. विचारांचा वारसा पुढे चालवावा लागतो. वारसा माझ्या आजोबांचा, वासरा माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा आहे", असं राज ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.
"बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय किंवा नसली काय, मला फरक पडत नसतो", असंही राज ठाकरे या व्हिडीओमध्ये (Raj Thackeray Speech Video) बोलवताना दिसत आहेत. मनसेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फक्त याच व्हिडीओची चर्चा होताना दिसते.
...वारसा विचारांचा असतो ! #प्रबोधनकारठाकरे #बाळासाहेबठाकरे #राजसाहेबठाकरे pic.twitter.com/cWOOFLekPa
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2022
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब, भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये वक्टीमकार्ड असं म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल, असं मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे.
आणखी वाचा - धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटापुढे 'या' चिन्हांचा पर्याय, वाचा सविस्तर