सावधान...अखेर वडिलांवर आली अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ

एका बापावर मनावर दगड ठेवून पोटच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.

Updated: Sep 9, 2021, 09:15 PM IST
सावधान...अखेर वडिलांवर आली अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ  title=

पुणे : शहरात एका बापावर मनावर दगड ठेवून पोटच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे हा मुलगा अल्पवयीन आहे. बापाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर घरातील सोनं चोरी केल्याप्रकरणी (Gold Jewellery Stealing) पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. प्राथमिक माहितीनुसार, या मुलाने 28 जुलैला आपल्याच घरातून 4 लाख 83 हजार किंमतीचं सोनं चोरलं होतं. त्यानंतर पैशांसाठी या मुलाने हे सोन्याचे दागिने विकण्यासाठी मित्राची मदत घेतली. (father lodged an fir against a 16 year old minor son for stealing gold worth Rs 4. 8 lakh rupees from his house in pune) 
 
घरातून सोनं चोरी झाल्याची माहिती मिळताच अल्पवयीन मुलाच्या बापाने मंगळवारी स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांना या अल्पवयीन मुलावर भारतीय दंड सहितेच्या अर्थात आयपीसीच्या 380  कल्मानव्ये गुन्हा दाखल केला आहे.  

चौकशीसाठी पोलिस कोठडी

स्थानिक पोलिस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे. तसेच सखोल चौकशीसाठी पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला कोठडीत घेतलं आहे.