मुंबई, झी मीडिया : उन्हाळ्यापासूनच भाज्यांचे दर चढे राहिले आहेत. त्यानंतर अति पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मुंबईत पोहोचणारी भाजी (Vegetables) खराब होत होती. तसेच, भाज्यांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे बाजारात (Market) भाज्यांचे दर चढेच राहिले. दरवर्षी श्रावणात भाज्या स्वस्त होतात. यंदा मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. गणेशोत्सव काळातही महागच भाज्या खरेदी कराव्या लागल्या. पण आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे भाज्यांचे दर कमी होत आहेत. मुंबईत भाज्यांचे दर आधीच्या दरांपेक्षा कमी झाले आहेत. (Find out the prices of vegetables that are cheap in the market now nz)
पालक 30 रुपये जुडी होती ती 20 रुपयाला मिळत आहे अळू ची पण 20 रुपयाला होती ती 10 रुपयाला मिळत आहेत. टोमॅटो 60 रुपये किलो वरून 40 रुपये किलो, वांगी 60 रुपये वरून 40 रुपये, 10 रुपयाला 2 लिंबू होते ते 4 रुपयाला मिळत आहे. मटार वाटाणा 80 रुपये 100 किलो वरून 60 ते 70 रुपये किलो मिळत आहेत. फुल कोबी 80 रुपये वरून 60 रुपये, पत्ता कोबी 60 वरून 40 रुपये किलो विकल्या जात आहे. कोथिंबीर 30 जुडी वरून 15 रुपये मिळत आहे
फक्त मुंबईतच नाही तर धुळ्यात ही भाज्यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे विक्रेते सांगत आहेत. शेतकऱ्यांना मात्र भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने आर्थीक झळ सहन करावी लागत आहेत. दर कमी झाल्याचा काहीसा लाभ मात्र ग्राहकांना मिळत आहे. 100 ते 120 रुपये किलो दराने विकले जाणारा भाजीपाला, सध्या किरकोळ बाजारपेठेत 40 ते 80 रुपये दरम्यान विकला जात आहे. येणाऱ्या काळात भाजीपाल्याचे दर असेच स्थिर राहतील असा अंदाज विक्रेते व्यक्त करीत आहेत.