जळगावमध्ये भीषण आग, ११ घरांची राखरांगोळी

शहरातील शिवाजीनगर भागातल्या भुरे मामलेदार दलफड परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने अकरा घरांना भीषण आग लागली. यात घरांची राखरांगोळी झाली.

Updated: Mar 13, 2018, 04:06 PM IST

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातल्या भुरे मामलेदार दलफड परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने अकरा घरांना भीषण आग लागली. यात घरांची राखरांगोळी झाली.

या आगीत सर्व सामानांची अक्षरशः राखरांगोळी झाली. सकाळी एक महिला देव्हाऱ्यात दिवा लावून घराबाहेर पडली होती. काही वेळाने लगेच आजूबाजूच्या घरांना ही आग लागली. या आगीत घरातील तीन गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट देखील झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं.

महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आलीय. मात्र या आगीमुळे रहिवाश्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.