Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर कुरघोडी, आजपासूनच शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलीय.

Updated: Oct 27, 2022, 07:37 PM IST
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर कुरघोडी, आजपासूनच शेतकऱ्यांच्या बांधावर title=

पुणे : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers Crop) पीकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेलं पीक दिवाळीच्या (Diwali 2022) तोंडावर हिरावून घेतलं. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळा (wet drought) जाहीर करावा, अशी मागणी आहे. मात्र तसं काही होतंय असं चित्र तरी नाहीये. दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर जात माजी पर्यावरण मंत्री आणि युवासनेप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakceray) यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. आत्महत्या करु नका, धीर धरा, असा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी दिला.  ( former minister aditya thackeray critisize to chief minister eknath shinde over to wet drought in maharashtra at pune and nashik tour)

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय. आदित्य ठाकरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे नाशिक-पुणे दौऱ्यावर आहेत. ठाकरेंनी यावेळेस शेतकऱ्यांशी जमिनीवर बसून संवाद साधला. तसेच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

राज्य सरकारवर हल्लाबोल 

"सरकारकडून काही अपेक्षा नाहीत. सरकार निर्दयी झालंय. मात्र तुम्ही खचून जावू नका, आत्महत्या करु नका", अशा शब्दात शेतकऱ्यांना धीर देत राज्यकर्त्यांवर टीका केली.

तसेच ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी अजूनही बांधावरील दौरे सुरू न केल्याची टीका केली. तसंच अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे का नाही पोहचले, असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल करा असं आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलं.