सांगली : सांगलीतल्या पोलीस कोठडीत खून करण्यात आलेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर तब्बल दोन महिन्यांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
अनिकेतचे वडील अशोक कोथळे यांनी अनिकेतवर अंत्यस्कार केले. तत्पूर्वी सीआयडीनं मिरज शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या अनिकेतचा मृतदेह कोथळे कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
अधिक तपासासाठी मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये अनिकेतचा मृतदेह ठेवण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 2017ला ओरापी आणि बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेनं आपल्या पोलीस कर्मचारी साथीदारांच्या मदतीनं अनिकेतची पोलीस स्टेशनमध्ये हत्या केली होती.
पुरावे नष्ट करण्यासाठी 9 नोव्हेंबर 2017 ला अंबोली घाटात मृतदेह जाळण्यात आला होता. मात्र नंतर हा मृतदेह अर्धवट अवस्थेत सापडला आणि पोलिसांच्या या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला.