मुंबई : कोरोनाचा कहर पाहता रेल्वे सेव सामान्य प्रवाश्यांकरता अद्यापही बंद आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहेत. शिवाय काही प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या देखील सुरू करण्यात आल्या आहेत. तर मध्य रेल्वेने आणखी ४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड या विशेष गाडीच्या थांब्यात बदल करण्यात आले आहे.
४ विशेष गाड्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- कामाख्या वातानुकूलित साप्ताहिक, पुणे- हावडा दुरंतो द्वि-साप्ताहिक, पुणे- हजरत निजामुद्दीन वातानुकूलित साप्ताहिक पुणे- हजरत निजामुद्दीन दुरांतो द्वि-साप्ताहिक या गाड्या धवणार आहेत.
- लोकमान्य टिळक टर्मिनस- कामाख्या वातानुकूलित साप्ताहिक
०२५२० वातानुकूलित विशेष ट्रेन दि. १५.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कामाख्या येथून दर गुरुवारी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्या दिवशी पोहोचेल. ०२५१९ वातानुकूलित विशेष ट्रेन दि. १८.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी सुटेल व कामाख्या येथे तिसर्या दिवशी पोहोचेल.
तर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपुर, बेगुसराई, खगरिया, नौगाचीया, कठिहार, किशनगंज, न्यु जलपाईगुडी, न्यु कुचबेहार, न्यु बोन्गाईगाव, रांगीया याठिकाणी थांबणार आहे..
- पुणे- हावडा दुरंतो द्वि-साप्ताहिक विशेष
०२२२२ दुरांतो विशेष ट्रेन दि. १५.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हावडा येथून प्रत्येक गुरुवार आणि शनिवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी पुण्याला पोहोचेल. ०२२२१ दुरांतो विशेष ट्रेन दि. १७.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवार व शनिवारी पुणे येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी हावडा येथे पोहोचेल. तर दौंड वगळता सर्व स्थानकांवर थांबणार आहे.
- पुणे- हजरत निजामुद्दीन वातानुकूलित साप्ताहिक विशेष
०२४९४ वातानुकूलित विशेष ट्रेन दि. १६.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हजरत निजामुद्दीन येथून दर शुक्रवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी पुण्यात दाखल होईल. ०२४९३ वातानुकूलित विशेष ट्रेन दि. १८.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.
- पुणे- हजरत निजामुद्दीन दुरांतो द्वि-साप्ताहिक विशेष
०२२६४ दुरांतो विशेष ट्रेन दि. १५.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हजरत निजामुद्दीन येथून दर सोमवार आणि गुरुवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी पुण्यात पोहोचेल. ०२२६३ दुरांतो विशेष ट्रेन दि. १६.१०.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार आणि शुक्रवारी पुणे येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.
मध्य रेल्वेने सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांनी प्रवास करणााऱ्यांसाठी आरक्षण अनिवार्य असणार आहे. ०२५१९ आणि ०२४९३ वातानुकूलित विशेष आणि ०२२२१ आणि ०२२६३ दुरोन्तो विशेष गाड्यांचे बुकिंग १३ ऑक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होणार आहे.