यवतमाळ, परभणी : ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat elections) मतदानाच्या पूर्व संध्येला परभणी (Parbhani) तालुक्यातील झरी येथे मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटत असतांना चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 41 हजारासह रंगेहाथ अटक केली. तर यवतमाळ ( Yavatmal) येथे अखेरच्या टप्प्यात दोन गटात प्रचंड हाणामारी झाली.
गावगाड्याची निवडणूक#Election #Grampanchayatelection #GavgadyachyaBatmya pic.twitter.com/zDwvN8Kva7
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 15, 2021
परभणी जिल्ह्यात आज 4 हजार 898 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. मात्र मतदानाच्या पूर्व संध्येला परभणी तालुक्यातील झरी येथे मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटत असतांना चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 41 हजारासह रंगेहाथ अटक केलीये. हे चार आरोपी हे मतदाराला लाच देऊन मतदान करण्याचं आवाहन करीत असताना पोलिसांना आढळून आले.
अहमदनगर । ग्रामपंचायत निवडणूक, राळेगणसिद्धीत आचारसंहितेचा भंग pic.twitter.com/nAfRHDOVBC
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 15, 2021
पुणे- दौंड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोल pic.twitter.com/Bage0ciCYk
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 15, 2021
यवतमाळ मध्ये शेंबाळपिंपरी ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान अखेरच्या टप्प्यात दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. मतदान केंद्रावर हाणामारी झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला. जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतच्या निवडणुकी दरम्यान उर्दू शाळेच्या मतदान केंद्राच्या आवारात हाणामारीची ही घटना घडली. त्यामुळे काही काळ मतदारांमध्ये दहशत पसरली. हे मतदान केंद्र अतिसंवेदनशील गटात मोडत असूनसुद्धा सुरक्षा व्यवस्था अपुरी पडल्याचा आरोप यावेळी झाला.