Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video : वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…वसंत ऋतूची चाहूल देत आलेला चैत्र महिना उल्लासपूर्ण वातावरणात नववर्षाची सुरूवात करतो. आनंदमय, जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात...
घरात चैतन्याचं वातावरण, तोरण..फुलांचे हार आणि दारावर विजयाची गुढी...अहो पण रांगोळीशिवाय सगळं कसं अपूर्ण...तुम्हाला रांगोळी जमत नाही...काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला सोपी आणि सुरेख रांगोळी व्हिडीओच्या माध्यामतून दाखविणार आहोत.
हिंदू धर्मात रांगोळीचं खूप महत्व आहे. प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते मग आज पण रांगोळी तर हवीच...चला हे व्हिडीओ बघा आणि सुरेख रांगोळी काढा.
येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!