हेमंत चापुडे (झी मिडीया शिरूर पुणे) : पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार वादळी वाऱ्यासह वरूणराजाचे आगमन झाले. मात्र आणि पाऊसाच्या प्रतिक्षेत असताना पाऊसाचा हाहाकार वाढला अन रस्ते, शेती, ओढे, नाले दुथडी भरुन वाहत होते. तर दुसरीकडे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला.
गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे नजर लावून बसलेल्या बळीराजाला आज झालेल्या पाऊसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर काही प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
या पुढच्या काळात ही वरूणराजा शेतकऱ्यांवरती असाच मेहरबान राहिला तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात पेरणी करता येणार आहे.त्यामुळे आज झालेल्या पाऊसामुळे बळीराज्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती निश्चितच आनंदाचे वातावरण आहे.