मुंबई : पुढील २४ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्हात ही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.
मुंबईत काही भागात मुसळधार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र पावसाचा जोर कमी असेल. चार दिवसानंतर म्हणजे गुरूवार नंतर मराठवाडा काही भागात मुसळधार पाऊस सुरु होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरलाय. कोकणात दमदार पावसामुळे पेरण्यांची कामेही सुरु झालीत.