लोणावळा : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना आठवण होते ती लोणावळ्याच्या भूशी डॅमची. भूशी डॅम भरून वाहू लागलाय. लोणावळा शहरात शनिवारी आणि रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भूशी डॅम भरभरून वाहू लागलाय.
पावसाळ्यात भूशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यावर धरणाच्या भिंतीवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्यात डुंबण्यासाठी याठिकाणी जणू पर्यटकांचा कुंभमेळाच भरतो. यावर्षीच्या पावसाळ्यातलं पर्यटकांचं पहिलं शाही स्नान भूशी डॅमच्या पाय-यांवर पार पडलं. शनिवारी दुपारनंतर लोणावळ्यात २६ तासात २०० मिलीमीटर पाऊस झाला.
सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमाराला भूशी धऱण काठोकाठ भरलं आणि पाणी भरून वाहू लागलं. मागच्या वर्षी २ जुलैला भूशी डॅम भरला होता. यावर्षी तुलनेत लवकरच धरण भरलं. शनिवारी रविवार सोमवार असा लाँग विकेंड पर्यटकांना मिळाला होता त्याचं सार्थक झालं.