कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेकांची तारांबळ झाली. वाळवा तालुक्यातील इस्लामपूरमध्ये ही पाऊस झाला. सांगलीत कांदे, मांगले येथे गारसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. शिराळा तालुक्यातील कांदे, मांगले गावात वादळी वारे आणि गारपीट झाली.
BreakingNews । कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
#Maharashtra #rains@ashish_jadhao pic.twitter.com/HNXUsZBqeG— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 25, 2020
रायगड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. महाड ,पोलादपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. महाडमधील वरंध गाव तसेच औद्योगिक परिसरात पावसाच्या हलक्या सरी झाल्यात. अवकाळी पावसामुळे आंबा काजू उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणच्या शेतमालाच नुकसान झाले. आजच्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला.
पुणे जिल्ह्यातील बारामती , दौंड तालुक्यात काही भागात विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाची हजेरी लावली. बारामती तालुक्यातील मोरगांव , सांगवी परिसरात तर दौंड तालुक्यातील राहू तसेच बेट परीसरातील वाळकी,मिरवडी,कोरेगाव भिवर,पिंपळगाव आदी गावामध्ये सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस पडला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा होता .बुधवारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वारा, विजेच्या कडकडाटात अर्धातास पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. या अवकाळी पाऊसामुळे कापणीस आलेले गहू पीक तसेच कांदा,आंबा पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
पाऊसामुळे जिवापाड जपलेल्या आंब्याच्या मोहोर तसेच लहान कैरी गळून पडल्या.काढणीस आलेल्या गव्हाचा रंग बदलून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गव्हाच्या विक्री दरामध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.