मुंबई : Hijab Controversy : कर्नाटकात 'अल्लाहू अकबर' नारे देणाऱ्या मुस्कानला जमीयत उलेमा-ए-हिंदकडून 5 लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. नारेबाजी करणाऱ्यांना एकटी भिडल्याने कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, कर्नाटकातील हिजाबच्या वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. मुंबईत मुस्लीम महिला रस्त्यावर तर मालेगावात मुस्लीम महिलांनी मोर्चा काढला आहे. तसेच तर बीडमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. (Hijab Controversy : Hijab Controversy reverberates in Maharashtra)
कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटणे सुरूच आहे. हिजाबच्या समर्थनार्थ सोलापुरात दोन मोठी आंदोलने झाली. शेकडो मुस्लिम महिला अचानक कलेक्टर ऑफिसच्या प्रांगणात येऊन निदर्शने करु लागल्या. या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटक सरकारविरोधात तसेच मोदी सरकारविरोधात निदर्शनं आणि घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे सोलापूर कर्नाटक सीमेवरही प्रहार संघटनेने हिजाबच्या समर्थनार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, कर्नाटक- 'अल्लाहू अकबर'चे नारे देणाऱ्या तरुणीला इनाम जाहीर करण्यात आले आहे. (Muskan announced a prize of Rs 5 lakh) मुस्कानला जमीयत उलेमा-ए-हिंदकडून 5 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. नारेबाजी करणा-यांना मुस्कान एकटी भिडल्याने संघटनेकडून हे बक्षीस देण्यात येणार आहे. उडुपी हिजाब वादानंतर ओवेसींकडूनही तरुणीला इनाम जाहीर.
उडुपीत हिजाब वाद सुरुय. याच दरम्यान 'अल्लाहू अकबर' नारे देणा-या तरुणीला बक्षीस जाहीर झालंय. जमीयत उलेमा- ए-हिंद संघटनेनं मुस्कानला 5लाख रोख देण्याचं जाहीर केलं. आंदोलकांना ती एकटीनं भिडल्यानं बक्षीस जाहीर झालंय. एमआयएमचे असदद्दुदीनं ओवेसींनीही तिचं कौतुक केले आहे.