मी झोपेत असताना पती माझे 'तसले' फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव

Mumbai Crime News: एका महिलेने आपल्या पती व सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने मानसिक छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत नमूद केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 24, 2023, 01:58 PM IST
मी झोपेत असताना पती माझे 'तसले' फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव title=
Husband took obscene photos when wife sleeps on night dress mumbai news

Mumbai News Today:  मॅट्रिमोनिअल साइटवर लग्न जुळले, मुंबईतल्या मोठ्या बंगल्यात थाटात लग्नदेखील पार पडले. मात्र, नव्याचे नऊ दिवस संपताच पती आणि सासरच्या मंडळीने छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसंच, माझ्या संमतीशिवाय नाईट ड्रेसवर झोपलेली असताना पतीने फोटो काढल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) महिलेने ही तक्रार दिली आहे. (Mumbai Crime News)

एका वृत्तापत्राच्या वृत्तानुसार, महिलेचे मॅट्रिमोनिअल साइटवरुन लग्न जुळलं होतं. 8 डिसेंबर 2019 रोजी मढच्या एका बंगल्यात मोठ्या थाटात विवाह पार पडला होता. मात्र लग्नाच्या सुरुवातीपासून तिचे पतीसोबत खटके उडत होते, असं तिने तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिला ही एका इलेक्ट्रिकल कंपनीत कार्यरत असून ती वांद्रे येथे राहते. 

लग्न ठरल्यापासून पती तिच्याशी वाद घालत होता. तसंच, लग्नातील खाण्या-पिण्यावरुन आणि लग्नातील ड्रेसवरुनही त्याने तिच्याशी वाद घातला होता. इतकंच नव्हे तर सासूनेही तिच्या रंगरुपावरुन लग्नात टोमणे मारले होते, असंही तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. 

लग्नानंतरच्या पाच वर्षांत सतत पती मानसिक छळ करत होता. तसंच, बेडरुममध्ये नाईट ड्रेसवर झोपलेली असताना पतीने गेल्या पाच वर्षांत 40 पेक्षा जास्त अश्लील फोटो तिच्या संमतीशिवाय काढले. त्यानंतर वेळोवेळी हे फोटो पीडित महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवून मानसिक त्रास देत होता. तर सासऱ्यांनीही पतीने काढलेले फोटो लीक करू, अशी धमकी दिली होती. तिला घरात घेण्यासही विरोध केला होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. 

नाते सुधारण्यासाठी महिलेने एक शेवटचा उपाय म्हणून ऑक्टोबर 2021मध्ये पतीला घेऊन समुपदेशनासाठी घेऊन गेली होती. मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नाही. अखेर या त्रासाला कंटाळून महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, यावेळी लग्नाच्या वेळी माहेरून मिळालेल्या जवळपास 150 वस्तू परत मागितल्या आहेत. त्यात सॅनिटरी पॅडचाही समावेश आहे.