Dhule Crime News : सध्या सर्वांनाच इन्स्टाग्रामटे वेड लागले आहे. इन्स्टावर फेमस होण्यासाठी तरुण चित्र विचित्र रिल बनवत आहेत. प्रवासात, रस्त्यात, बस स्थानकावर कुठेही तरुण रील बनवतात. अशाच प्रकारे बस स्टॉपजवळ भर रस्त्यात रिल बनवणे धुळे येथील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाचा व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि अशी अद्दल घडवली की तो पुन्हा अशा प्रकारे रिल बनवण्याचा विचार देखील करणार नाही.
धुळे शहरातील देवपूर बस स्थानकात इन्स्टा रील तयार करणाऱ्या एका तरुणाची हिरोगिरीची नशा पोलिसांनी चांगली उतरवली आहे. बस स्थानाकात बसची वाटपाहणाऱ्या मुलींसमोर याने इन्स्टा रील तयार केली. व्हिडिओ बनवताना विद्यार्थिनींना आपत्ती जनक वाटेल अशा पद्धतीने त्याने हावभाव केले. या तरुणाला पोलिसांनी माफी मागायला लावाली आहे. या तरुणाला चांगलीच अद्दल घडवल्याने टवाळखोरी करणाऱ्यांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी कारवाई केलेला तरुण हा शिंदखेडा तालुक्यातील आहे. हा तरुण बस स्थानकावर आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवर आला. जेथे मुली बसची प्रतीक्षा करत होत्या, त्या ठिकाणी त्याने बाईक थांबवली. बाईकवरुन उतरुन तो इन्स्टा रिल तयार करायला लागला. तरुणींना त्याने विचित्र हावभाव केले. व्हिडिओ बनवत असताना त्याने काही मुलींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या तरुणाचा विचित्रपणा पाहून तरुणी तेथून निघून गेल्या.
या तरुणाच्या कृत्यामुळे तरुणी संतापल्या. शेवटी या तरुणाने आपला व्हिडिओ पूर्ण केला आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. या तरुणाविरोधात तक्रार दाखल झाली. तसेच कारवाईची मागणी देखील झाली. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओ पाहून या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तात्काळ या तरुणाचा शोध घेतला व त्याला त्याब्यात घेतले. त्यानंतर या तरुणाला बस स्थानकावर नेण्यात आले. जेथे त्याने रीव बनवला तेथेच पोलिसांनी त्यांनी अद्दल घडवली. ज्या मुलींसमोर रील बनवला त्यांच्या समोर उठाबशा काढायला सांगून पोलिसांनी या तरुणाला मुलींची पाया पडून माफी देखील मागायला सांगितली. पोलिसांनी या तरुणावर केलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारे रिल बनवून मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.