जळगाव, परभणी, धुळे : Heavy Rrains in Jalgaon : मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. (Heavy Rrains) कन्नड घाटात (Kannad Ghat ) परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. वाहतुकीसाठी घाट आठ दिवस बंद राहणार आहे. चाळीसगावात पुराचा वेढा ओसरला मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, कन्नड घाटात 7 ते 8 ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या घाटाच्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरु आहे.
चाळीसगावात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने खूप नुकसान झाले आहे. ढगफुटीनंतर आता पुराचा वेढा आता हळूहळू ओसरू लागला आहे. पण, कन्नड घाटात 7 ते 8 ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या घाटाच्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू असून घाट 8 दिवसांसाठी बंद राहणाराय...चाळीसगाव पुराचा तडाखा अनेक घरांना बसला. गाड्या, घरं पाण्याखाली गेली तर 500 हून अधिक गुरे वाहून गेल्याची माहिती आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करून मदत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चाळीसगावमध्ये ढगफुटीमुळे पुरानं थैमान घातलंय. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पाटणादेवी रोडवर ट्रक, गाड्या पाण्यात अडकल्यात. काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. काही कच्च्या घरांची पडझडही झालीये. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. (heavy rains in Jalgaon Parbhani Dhule and Ahmednagar)
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती होती. मात्र काही नागरिक अत्यंत बेजाबदारपणे वागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव शहरातील नदीच्या पुलावरून पाणी जात असताना जीवाची पर्वा न करता लोक सेल्फी काढण्यात मग्न होते. तर काही जण पुरामुळे पुलावरील उघडे झालेले लोखंडी समान चोरण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात उशिराने का असेना अखेर दिलासा देणाऱ्या पाऊसाने हजेरी लावली. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये पाऊस आला असला तरी अजूनही शिरपूर, शिंदखेडा, अक्राणी, अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. धुळे जिल्ह्याचा सरासरी पावसाचा विचार केला तर जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस झाला आहे.
परभणी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला. पालम तालुक्यातील लेंढी नदीच्या पुरात बैलगाडी वाहून जाऊन दोन बैलांचा मृत्यू झाला. पालम तालुक्यातीलच गळाठी नदीलाही पूर आलाय. त्यामुळं चाटोरी बोरगाव रस्त्यावरील मार्ग बंद पडला. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं, दिग्रस मधील अरुणावती धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे अरुणावती धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले. धरणात ८९ पॉईंट २४ टक्के जलसाठा असून, १८ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यात सेलू, हिंगणघाट, पुलगाव, कारंजा, आर्वी या तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरूय. 10 दिवसाच्या खंडानंतर पडलेल्या पावसाचा शेतकरी वर्गाला फायदा होणार असल्याचं कृषी विभागानं सांगितले आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागातील वीज पूरवठा खंडित केलाय. पण शेतीला या पावसाचा फायदा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना जिवदान मिळालं. पावसामुळे जिल्ह्यातील कयादू पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. छोटया ओढ्या नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही पिकांना पाऊस चांगला होत असला तरी, उडीद पिकासाठी मात्र हा पाऊस नुकसादायक मानला जात आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील शेतक-यांचं अतोनात नुकसान झालं. शेतीतील पिकांबरोबरच पशुधन आणि घरसंसारही वाहून गेले. यळी, कोरडगाव, सोमठाणे, भगूर भागात अतिवृष्टी झाली. नदीकाठच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या. गेल्या पन्नास वर्षांत असा पाऊस झाला नसल्याचं नुकसानग्रस्त शेतक-यांनी सांगितलं.