आतिष भोईर, कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता सर्व दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थपणा सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच शनिवारी आणि रविवारी फेरीवाल्यावर निर्बध असणार आहेत.
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात हॉटेल, रेस्टोररंट आणि बार सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. 8 नंतर पार्सल सेवा सुरू राहणार आहेत. व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर शनिवारी आणि रविवारी बंदचे आदेश स्थगित करण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज 898 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर अजूनही 8845 रुग्ण उपचार घेत आहेत. एका दिवसात 682 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आता चिंतेचं कारण बनत चालली आहे. रुग्णांचा बेड्स मिळणं आता कठीण झालं आहे. रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी सक्तीची केली जात आहे.