कोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन Timetable

Kokan Railway Timetable: कोकण रेल्वेने आता वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण किंवा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा हे वेळापत्रक पाहाच.  

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 30, 2024, 08:46 AM IST
कोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन Timetable  title=
konkan railway timetable Revised timing for trains plying through Konkan route from 1st nov

Kokan Railway Timetable:  कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आठ बिगर पावसाळी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. गाड्यांच्या फेऱ्यानुसार सुधारित वेळापत्रकाची १ नोव्हेंबरपासून अमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळं या बदलाची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असं अवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

दिवाळीच्या सुट्ट्यांनतर लगेचच डिसेंबरच्या सुट्ट्यांची सुरुवात होणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात लोकं सुट्ट्यांसाठी बाहेरगावी जातात. कोकण आणि गोवा येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळं कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाल्याने प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक माहिती असणे गरजेचे आहे. करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे. ७ नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. त्याचप्रमाणे वास्को द गामा पटणा (१२७४१) एक्स्प्रेसची रत्नागिरी स्थानकावर पोहोचण्याची सुधारित वेळ रात्री १२:३५ वाजता असणार आहे. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांडवी एक्स्प्रेस नडवली स्थानकात दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनल - मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर सायंकाळी ७:४२ वाजता पोहचेल. १ नोव्हेंबरपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे. एर्नाकुलम जंक्शन अजमेर (१२९७७), कोचुवेली - पोरबंदर एक्स्प्रेस (२०९०९), भावनगर - कोचुवेली (१९२६०) तसेच पोरबंदर ते कोचुवेली (२०९१०) एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

दिवाळीसाठी मध्य रेल्वे सोडणार जादा गाड्या

मध्य रेल्वेने मुंबई,पुणे आणि नागपूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने आता 570 रेल्वे गाड्या सोडणार असून त्यातील 180 गाड्या राज्यात धावणार आहेत. लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर, 378 सेवा या उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी आहेत.