छकुलीला न्याय मिळाला, निर्भयाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

सगळा समाज एकवटल्यामुळेच आपल्या छकुलीला लवकरात लवकर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील निर्भयाच्या आई-वडिलांनी व्यक्त केलीय.

Updated: Nov 29, 2017, 04:03 PM IST
छकुलीला न्याय मिळाला, निर्भयाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : सगळा समाज एकवटल्यामुळेच आपल्या छकुलीला लवकरात लवकर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील निर्भयाच्या आई-वडिलांनी व्यक्त केलीय.

या निकालानंतर निर्भयाला 'न्याय मिळाल्याची' प्रतिक्रिया तिच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांना दिलीय. त्याचबरोबर न्यायालयाचे, मुख्यमंत्र्यांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभारही मानलेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भय्यूजी महाराजांनी आम्हाला साथ दिली... सगळा मराठा समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळवून दिला... मी सगळ्या महाराष्ट्राचे आभार मानते, असं पीडित मुलीच्या आईनं म्हटलंय. 

<iframe width="970" height="545" src="https://www.youtube.com/embed/doHFjRize1g" frameborder="0" gesture="media" allow="encrypted-media" allowfullscreen></iframe>