मच्छरदाणीत झोपलेल्या बाळाजवळ बिबट्या येऊन झोपला...आईला समजलं आणि...

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत धामणगावातील ही घटना आहे. एका घरात पहाटे पहाटे बिबट्या घुसला.

Updated: Aug 14, 2018, 02:40 PM IST
मच्छरदाणीत झोपलेल्या बाळाजवळ बिबट्या येऊन झोपला...आईला समजलं आणि... title=

किरण ताजणे , झी मीडिया, नाशिक : आतापर्यंत तुम्ही बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील, पण ही बातमी धक्कादायक आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत धामणगावातील ही घटना आहे. एका घरात पहाटे पहाटे बिबट्या घुसला. त्या घरात मच्छरदाणीत एक लहान बाळ झोपलं होतं. या घटनेतील सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे, या बाळाच्या आईला काहीवेळाने बाळाच्या मच्छरदाणीत बाजूला बिबट्या झोपल्याचं दिसून आलं. (संपूर्ण बातमी व्हिडीओखाली वाचा)

पण बाळाच्या आईचा थरकाप उडाला असला, तरी तिने प्रसंगावधान राखत, आपल्या बाळाला वाचवण्यासाठी संयम ठेवत हळूच मच्छरदाणीतून आपल्या बाळाला बाजूला काढलं आणि तिच्या बाळाला मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलं. बाळाच्या आईने अखेर आपल्या बाळाला सुरक्षित बाहेर काढत सुटकेचा निश्वास टाकला.

यानंतर वनविभागाने या बिबट्याला जेरबंद केलं आहे. हा बिबट्या जास्त मोठा नसल्याचं सांगण्यात येत आहे. याच गावात काही दिवसांपूर्वी बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती.