Pune Lift Video: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलं लिफ्टच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात होते. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर 10 सेकंदातच लिफ्ट वरच्या मजल्यावरुन खाली कोसळली आहे. त्यामुळं थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (Pune CCTV Video) झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Pune Lift Video)
पुण्यातील बावधन परिसरातील ही घटना आहे. घटना घडली तेव्हा लिफ्टमध्ये दोन मुलं आणि त्यांची आई होती. तळमजल्यावरुन दहाव्या मजल्यावर लिफ्ट पोहोचली. त्यानंतर दोन्ही मुलं आईसोबत लिफ्टमधून बाहेर पडली. मुलं बाहेर पडताच दहा सेंकदात लिफ्ट खाली कोसळली.
महिलेला मुलांसोबत 7व्या मजल्यावर जायचं होतं. पण ही लिफ्ट 7व्या मजल्यावर थांबलीच नाहीत. मुलानं 7व्या मजल्याचं बटण दाबल पण तरीही लिफ्ट थेट 10व्या मजल्यावर जाऊन थांबली. लिफ्ट थांबताच मुलगा आणि महिला बाहेर आले. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद झाला. पण काही क्षणातच 10 व्या मजल्यावर थांबलेली लिफ्ट खाली कोसळली. महिला आणइ मुलं अजून काही वेळ लिफ्टमध्ये थांबले असते तर ते देखील लिफ्टसोबत कोसळले असते. त्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता होती.
पुणे: 10वीं फ्लोर से गिरी लिफ्ट, गिरने से कुछ सेकेण्ड पहले ही अंदर से निकले थे बच्चे #Pune #lift #PuneLift #viralvideo #ZindaBanda #SPARKTheLife #SafeInternetForKids #Jawan #realmePad2 #SPARKTheLife #Haryana pic.twitter.com/ZPp0TuPMDW
— CRIME CONTROL REFORM ORGANIZATION (CRO) ALL INDIA (@crocrimehq) July 31, 2023
इमारतीतील रहिवाशांनी इमारतीचा बिल्डर आणि त्याच्या साथीदारावर लिफ्टच्या मेंटेनन्सचे काम करणाऱ्या कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, घटनेची सखोल चौकशी करुण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, बिघडलेली लिफ्ट लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. भरत चौधरी नावाच्या व्यक्तीने ही तक्रार केली आहे. लिफ्टमध्ये असलेल्या मुलाचे वय 11 वर्ष इतके होते.
दरम्यान, 27 जुलै रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर 31 जुलै रोजी घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर 'क्राइम कंट्रोल रिफॉर्म ऑर्गेनाइजेशन ऑल इंडिया या अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.