Maharashtra Breaking News LIVE Updates : शिर्डी - साईचरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण

Maharashtra Breaking News LIVE Updates :  विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच काही महत्त्वाच्या घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.   

Maharashtra Breaking News LIVE Updates :  शिर्डी - साईचरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण

Maharashtra Breaking News LIVE Updates : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात एकिक़डे (vidhansabha Election 2024) आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे दिल्ली दरबारी असणाऱ्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. 

5 Oct 2024, 11:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : कोल्हापुरात शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कोल्हापुरात करण्यात आलं असून, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूरचे खासदार शाहूराजे छत्रपतीसुद्धा उपस्थित होते. अनावरण सोहळ्यावेळी शिवबांची माफी मागत राहुल गांधी यांनी कोकणातील त्या प्रसंगावर कटाक्ष टाकला. 

5 Oct 2024, 11:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : कोल्हापुरातील राहुल गांधींच्या दौऱ्याला भाजपचा विरोध 

कोल्हापुरातील राहुल गांधींच्या दौऱ्याला भाजपनं विरोध केला आहे. भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधींना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्यासाठी कार्यकर्ते आलेत. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी रोखलंय. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये  झटापट झालीय. दरम्यान वरिष्ठ्यांनी आदेश दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केलं.

5 Oct 2024, 11:17 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : जेवणातून गुंगीचं औषध... संजय राऊतांचा गंभीर आरोप 

वोट जिहाद हा फेक नेरीटिव्ह असून, तो संघाकडूनच पसरवला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. शिंदे सोबत गेलेले आमदार त्यांना त्यावेळेस जेवणामध्ये गुंगीचे औषधं दिली जात असल्याचा खळबळजनकं आरोपही संजय राऊत यांनी केलेला आहे. धुळ्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी संघ, भाजप, अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. यावेळेस नितेश राणे यांचा विषय निघाल्यावर त्यांनी अप शब्दांमध्ये उल्लेख करत राणें बद्दल बोलणे टाळले. अजित पवार हे आता सासरवाडीत आहेत की माहेर वाडीत याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन दौरे करीत आहेत, सरकारी यंत्रणा वापरून पक्षाचा प्रचार मोदी करतात, त्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नव्हे तर भाजपच्या एका विशिष्ट गटाचे पंतप्रधान असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

 

5 Oct 2024, 11:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : भिवंडीतील गोदामाला भीषण आग 

मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी इथं असणाऱ्या लॉजिस्टीक गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीमध्ये लाखोंच्या सामानाचं नुकसान झालं. आग इतक्या भीषण स्वरुपाती होती, की इथं तातडीनं अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांना बोलवण्यात आलं आणि नंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

5 Oct 2024, 10:25 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : कोकणातील निवती समुद्रात दोन खलाशांचा मृत्यू 

कोकणातील कुडाळ निवती समुद्रात मच्छीमारी नौका बुडून दोन खलाशांचा मृत्यू. मच्छीमारी नौकेत एकूण 14 खलाशी होते. मासे मारून परतत असताना नौका अचानक झाली पलटी. त्यातील 12 खलाशी बचावले मात्र दोन खलाशांचा बुडून मृत्यू.त्यातील एकाचा मासे मारण्याच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला.

5 Oct 2024, 09:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोपदेव घाटात घडलेल्या या घटनेच्या तपासाला आता वेग मिळताना दिसत असून, आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

5 Oct 2024, 08:53 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची रणनिती... पहिली यादीही जाहीर होणार 

आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेचा पुढील आठवड्यात मुंबईत होणार मनसैनिकांचा मेळावा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे जोरदार तयारी करत आहे. त्यातच मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा निवडणूक पार्श्वभूमीवर पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मार्गदर्शन. मनसेची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी पुढील आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता?

5 Oct 2024, 08:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : शिवशाही बस पेटली 

पंढरपूर पुणे पालखी मार्गावर असणाऱ्या वाडी कुरोली उड्डाण पूल येथे शिवशाही बस पेटली. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून अग्निशामक यंत्रणा बसला लागलेली आग विझवण्यासाठी पोहोचली आहे. 

5 Oct 2024, 08:15 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : पुणेकरांसाठी मोठी बातमी 

पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरा भोवती तयार होऊ घातलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या सुधारित खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या रिंग रोडचा अंदाजीत खर्च तीन वर्षात तब्बल दुपटीने वाढला आहे. रिंग रोडच्या कामासाठी 22 हजार 375 कोटींच्या वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 42 हजार 710 कोटींवर पोहोचला आहे. रिंग रोड प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग निघणार आहे.

5 Oct 2024, 08:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पोलीस स्टेशनची प्रचंड नासधूस झाली असून, पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेक केल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रुधूराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. या दगडफेकीत दहापेक्षा अधिक पोलीस जखमी असल्याची माहिती असून, सध्या नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या तणावपूण शांतता पाहायला मिळत आहे. शिवाय नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून, मध्यरात्री एक नंतर परिस्थिती नियंत्रणात आली आल्याची माहिती मिळत आहे.