Maharashtra Breaking News LIVE Updates : शिर्डी - साईचरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण

Maharashtra Breaking News LIVE Updates :  विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच काही महत्त्वाच्या घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.   

Maharashtra Breaking News LIVE Updates :  शिर्डी - साईचरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण

Maharashtra Breaking News LIVE Updates : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात एकिक़डे (vidhansabha Election 2024) आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे दिल्ली दरबारी असणाऱ्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. 

5 Oct 2024, 08:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रात NIA आणि ए टी एसची संयुक्त कारवाई

महाराष्ट्रात NIA आणि ए टी एस यांची संयुक्त कारवाई. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि जालन्यात संयुक्तिक कारवाई. काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती. देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशयातून कारवाई

5 Oct 2024, 08:00 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर 

राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर असून, त्यांचा दौरा 1 दिवसानं पुढे ढकलण्यात आला आहे. खराब हवामानामुळे राहुल यांचा दौरा 1 दिवसानं पुढे ढकलला गेलाय. त्यामुळे राहुल गांधी आज सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत.

 

5 Oct 2024, 07:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : अजित पवारांची बारामतीतून माघार 

अजित पवारांनी बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिलेत. जो उमेदवार देईन त्याला निवडणून आणा, असं जाहीर आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय. त्यांच्या या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. 

 

5 Oct 2024, 07:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत 

वाशिमनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे आणि मुंबईत येणार आहेत. त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. मोदी मुंबई मेट्रो-3 भुयारी मार्गाचं उद्घाटन करणार आहेत. JVLR ते बीकेसी विभागाच्या मुंबई मेट्रोचं उद्घाटन आज  नरेंद्र मोदी करणार आहेत. महाराष्ट्रातली पुण्यानंतरची ही दुसरी भूमिगत मेट्रो आहे. JVLR ते बीकेसी विभागाच्या बांधकामासाठी सुमारे 14 हजार 120 कोटी रुपयांचा खर्च आलाय. या विभागात एकूण 10 स्टेशन्स आहेत. त्यापैकी 9 स्टेशन्स भूमिगत आहेत. मेट्रो लाईन 3 पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर दररोज 12 लाख मुंबईकर यातून प्रवास करतील. मुंबई मेट्रोसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचीही पायाभरणी करणार आहेत.

 

5 Oct 2024, 07:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा  आज महाराष्ट्र दौरा आहे. मोदी सकाळी वाशिम दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी विशेष हेलिकॉप्टरनं पोहरादेवीला पोहोचणार असून, त्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करणार आहे.