Thane PM Modi on Congress : ठाण्यातल्या सभेत मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 05 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Thane PM Modi on Congress : ठाण्यातल्या सभेत मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

5 Oct 2024, 21:41 वाजता

काँग्रेस देशातील सर्वाधिक भ्रष्ट पक्ष - पंतप्रधान मोदी

 

Thane PM Modi on Congress : ठाण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस जनतेचं शोषण करणारा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली... काँग्रेस देशातील सर्वाधिक भ्रष्ट पक्ष, काँग्रेसनं गरिबांना गरीबच ठेवलं..   तसंच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सर्व योजना बंद करतील.. महाविकास आघाडीपासून सावध राहा... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

5 Oct 2024, 18:53 वाजता

मविआ ही विकासाच्या विरोधी आघाडी - पंतप्रधान मोदी

 

Thane PM Modi on MVA : ठाण्यात मोदींच्या हस्ते तब्बल 32 हजार कोटींच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी आयोजित सभेतून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर घणाघाती टीका केलीय. मविआच्या काळात अंहकारामुळे मेट्रो-3 प्रकल्पाला स्थगिती दिल्याचा आरोप मोदींनी केला.. त्यामुळे मविआ ही विकासाच्या विरोधी आघाडी आहे.. असंही मोदींनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

5 Oct 2024, 18:29 वाजता

जत तालुक्यात वरीच्या तांदळामुळे 40-50 जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

 

Sangli poisoning : सांगलीच्या जत तालुक्यात 40 ते 50 नागरिकांना विषबाधा झालीये.. यामध्ये  जत तालुक्यातील माडग्याळ, वसपेठ, गुड्डापूर, आबाचीवाडी गावातील नागरिकांचा समावेश आहे. काल रात्रीपासून सर्वांना उलटी, डोक दुखणे यासह जुलाबाचा त्रास जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. भगरीच्या तांदळाच्या पिठाच्या भाकरी बनवून खाल्यानं हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय..सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये.

5 Oct 2024, 17:51 वाजता

गोवंडी पोलिसांकडून गणेश हंडोरेला अटक, बाईक स्वाराला उडवल्याचा आरोप

 

Chandrakant Handore son Arrest : काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला मुंबईतील गोवंडी पोलिसांनी अटक केलीये... शुक्रवारी रात्री दुकाचीस्वाराला धडक दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे... मुंबईतील चेंबुरच्या आचार्य कॉलेज जवळ गोपाळ आरोटेच्या दुचाकीला गणेश हंडोरेच्या कारनं धडक दिली आणि पळ काढल्याचं हंडोरेनं म्हटलं... तर गोपाळ आरोटेला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय... याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गणेश हंडोरे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

5 Oct 2024, 14:21 वाजता

पेसा भरतीबाबत सरकारकडून GR जाहीर, आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश

 

PESA Bharti : पेसाभरतीसाठी आदिवासी आमदारांची मंत्रालयात केलेल्या आंदोलनाला यश आलंय.. राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत GR काढण्यात आलाय.. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारनं परवानगी दिलीये..पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी आमदारांनी काल मंत्रालयाच्या संरक्षण जाळ्यांवर उड्या मारुन आंदोलन केलं होतं.. तसंच काल दिवसभर सरकार विरोधात धरणं आंदोलनही केलं होतं.. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असतांनाही सरकारनं हा जीआर काढला असून कोर्टाच्या आधीन राहून मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 

5 Oct 2024, 14:07 वाजता

'नियत खोटी असल्यानं शिवरायांचा पुतळा पडला',राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

 

Rahul Gandhi : कोल्हापूरच्या सभेतून आज राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. देशात दोन विचारसरणी आहेत. त्यातील एक विचारसरणी संविधान संपवतेय, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय. याच विचारसरणीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक होऊ दिला नाही. नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडलाय, अशी टीका राहुल गांधींनी केलीय. विचारसरणीची लढाई हजारो वर्षापूर्वींची आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजही लढले आणि आज काँग्रेसही लढत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय. 

5 Oct 2024, 13:57 वाजता

'शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला नापसंत', टू द पॉईंटमध्ये रोहित पवारांचा दावा

 

Rohit pawar On CM Shinde : महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला आवडलेली नाही.. अशा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हा मोठा दावा केलाय. त्याचसोबत शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी कुटुंब फोडलं असा मोठा आरोपही रोहित पवारांनी केलाय.. मात्र लोकं ही शरद पवारांची ताकद आहेत असा इशारा रोहित पवारांनी सत्ताधा-यांना दिलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Oct 2024, 13:15 वाजता

मालेगावात होमिओपॅथिक क्लिनिकसह 2 ठिकाणी NIAचे छापे

 

Nashik Malegaon NIA Raid Homeopathy Clinic : नाशिकच्या मालेगावात NIAचा छापा...होमिओपॅथिक क्लिनिकसह दोन ठिकाणी कारवाई...मालेगाव शहरातील अब्दुल्ला नगरमध्ये छापा...रात्रीपासून NIAच्या पथकाकडून चौकशी सुरु

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Oct 2024, 12:22 वाजता

 छत्तीसगडमध्ये सुरक्षादल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 40 नक्षलवादी ठार

 

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक...चकमकीमध्ये 40 नक्षलवादी ठार...नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त...घातपाताचा मोठा कट उधळला

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Oct 2024, 11:50 वाजता

'भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना?', रोहित पवारांची तिसरी आघाडीवर शंका 

 

Rohit Pawar : तिसरी आघाडी म्हणजे भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना अशी शंका आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलीय. मतविभाजन करण्यासाठीच तिसरी आघाडी उघडल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत रोहित पवारांनी हे विधान केलंय. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय म्हणून संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. याच तिस-या आघाडीवर रोहित पवारांनी आपली शंका बोलून दाखवली आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा-