पुणे : पुण्यातील लोकसेवा सहकारी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलाय. बॅंकेची आर्थिक स्थिती खालावलेली असतानाच बॅंकिंग कायद्याचं पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेनं ही कारवाई केलीय.
माजी आमदार दीपक पायगुडे हे या बॅंकेचे संस्थापक आहेत. मागील ५ वर्षांपासून बॅंकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध असून प्रशासकीय मंडळाकडे कारभार सोपवण्यात आलाय. असं असताना बॅंकेकडे विहित भांडवलाची कमतरता आहे.
थकीत कर्जाची परतफेड झालेली नाही. यांसह बॅंकेची स्थिती सुधारण्याबाबत प्रयत्न झालं नसल्याचं कारण देत रिझर्व्ह बॅंकेनं या बॅंकेचा परवानाच रद्द केलाय. परिणामी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी आली असून बॅंकेवर अवसायक नेमण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेनं दिलेत.