ठाकरेंच्या 96 उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर! तुमच्या मतदारसंघातून उमेदवार कोण पाहा

Uddhav Thackeray Shivsena Full Candidate List: सर्वाधिक उमेदवार देणाऱ्या पक्षांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष चौथ्या स्थानी आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 30, 2024, 01:38 PM IST
ठाकरेंच्या 96 उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर! तुमच्या मतदारसंघातून उमेदवार कोण पाहा title=
ठाकरेंच्या सर्व उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी

Uddhav Thackeray Shivsena Full Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 152 जणांना उमेदवारी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 78 जागांवर उमेदवार दिले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 52 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 87 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसने 104 जागांवर आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं 96 जागांवर उमेदवार दिले आहेत. 

ठाकरेंच्या उमेदवारांची संपूर्ण यादी

उद्धव ठाकरेंच्या पक्षाने नेमकी कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली आहे पाहूयात त्यांच्या 96 उमेदवारांची संपूर्ण यादी...

1. चाळीसगाव – उन्मेश पाटील
2. पाचोरा – वैशाली सुर्यवंशी
3. मेहकर (अजा) – सिद्धार्थ खरात
4. बाळापूर – नितीन देशमुख
5. अकोला पूर्व – गोपाल दातकर
6. वाशिम (अजा) - डॉ. सिद्धार्थ देवळे
7. बडनेरा – सुनील खराटे
8. रामटेक – विशाल बरबटे
9. वणी – संजय देरकर
10. लोहा – एकनाथ पवार

11. कळमनुरी – डॉ. संतोष टारफे
12. परभणी – डॉ. राहुल पाटील
13. गंगाखेड – विशाल कदम
14. सिल्लोड – सुरेश बनकर
15. कन्नड – उदयसिंह राजपुत
16. संभाजीनगर मध्य – बाळासाहेब थोरात 
17. संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे
18. वैजापूर – दिनेश परदेशी
19. नांदगांव – गणेश धात्रक
20. मालेगांव बाह्य – अद्वय हिरे

21. निफाड – अनिल कदम
22. नाशिक मध्य – वसंत गीते
23. नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर
24. पालघर (अज) – जयेंद्र दुबळा
25. बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी
26. भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ
27. अंबरनाथ – (अजा) – राजेश वानखेडे
28. डोंबिवली – दिपेश म्हात्रे
29. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
30. ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा

31. कोपरी पाचपाखाडी – केदार दिघे
32. ठाणे – राजन विचारे
33. ऐरोली – एम.के. मढवी
34. मागाठाणे – उदेश पाटेकर
35. विक्रोळी – सुनील राऊत
36. भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
37. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
38. दिंडोशी – सुनील प्रभू
39. गोरेगांव – समीर देसाई
40. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके

41. चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
42. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
43. कलीना – संजय पोतनीस
44. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
45. माहिम – महेश सावंत
46. वरळी – आदित्य ठाकरे
47. कर्जत – नितीन सावंत
48. उरण – मनोहर भोईर
49. महाड – स्नेहल जगताप
50. नेवासा – शंकरराव गडाख

51. गेवराई – बदामराव पंडीत
52. धाराशिव – कैलास पाटील
53. परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील
54. बार्शी – दिलीप सोपल
55. सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील
56. सांगोले – दीपक आबा साळुंखे
57. पाटण – हर्षद कदम
58. दापोली – संजय कदम
59. गुहागर – भास्कर जाधव
60. रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने

61. राजापूर – राजन साळवी
62. कुडाळ – वैभव नाईक
63. सावंतवाडी – राजन तेली
64. राधानगरी – के.पी. पाटील
65. शाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील
66. धुळे शहर- अनिल गोटे
67. चोपडा- (अज) प्रभाकर सोनवणे 
68. जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
69. बुलढाणा- जयश्री शेळके
70. दिग्रस - पवन श्यामलाल जयस्वाल

71. हिंगोली- रूपाली राजेश पाटील
72. परतूर- आसाराम बोराडे
73. देवळाली (अजा) योगेश घोलप
74. कल्याण पश्चिम- सचिन बासरे
75. कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
76. वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव
77. शिवडी- अजय चौधरी
78. भायखळा- मनोज जामसुतकर
79. श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
80. कणकवली- संदेश भास्कर पारकर

81. वर्सोवा - हरुन खान
82. घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
83. विलेपार्ले - संदिप नाईक
84. दहिसर - विनोद घोसाळकर
85. सातारा जावळी - अमित कदम
86. दर्यापूर- गजानन लवटे
87. मलबारहील - भैरूलाल चौधरी 
88. कोथरूड -  चंद्रकांत मोकाटे
89. बोरिवली - संजय भोसले
90. खेड आळंदी- बाबाजी काळे 

91. मिरज- तानाजी सातपुते 
92. पैठण- दत्ता गोरडे 
93. औसा- दिनकर माने 
94. पेण - प्रसाद भोईर 
95. अलिबाग- सुरेंद्र म्हात्रे 
96. पनवेल- लीना गरड