'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 21, 2024, 11:03 AM IST
'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार? title=
जागावाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महायुतीमधील जागा वाटपावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त असून मोजक्या जागांवरुन भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद असून हे मतभेद राज्यातच सोडवले जातील असं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन जोरदार घामसान सुरु आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज म्हणजेच 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत जागावाटपावर तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये नेमका काय वाद आहे याची खरी माहिती समोर आली आहे.

काहीही करा मात्र...

महाराष्ट्र काँग्रेसची रात्री उशीरा बैठक पार पाडली. या बैठकीमधील इनसाईड स्टोरी समोर आली असून बैठकीदरम्यान, शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या भूमिकेवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जागावाटपात सहकार्य केलं जातं नसल्याचा राज्यातील नेत्यांचा सूर असून त्यांनी तशी माहिती वरिष्ठ नेत्यांना कळवली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांची एकमुखाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात आपलं काय म्हणणं आहे ते कळवलं आहे. "काहीही करा मात्र विदर्भातील त्या जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडू नका," असं काँग्रेसच्या नेत्यांनी खरगेंना सांगितलं आहे. 

नक्की वाचा >> मुंबईत कहानी में ट्विस्ट... BJP ने तिकीट न दिल्याने 'हा' बडा नेता थेट ठाकरेंच्या सेनेत? निवडणूक लढणारच

लोकसभेपासूनच काँग्रेसचे नेते सक्रीय

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचं राज्यातील केडर सक्रियं झालं असून अनेक जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो, असं राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. याच कारणामुळे ठाकरेंशी जागांवरुन तडजोड करताना जागांबाबत झुकतं माप घेऊ नका असं राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळवल्याचं वृत्त आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही सांगलीच्या जागेसारखीच आहे, त्यामुळे यावावर वरिष्ठांनी विचार करावा असं राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते या जागांबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

नक्की वाचा >> काकांकडून पुतण्याचा 'टप्प्यात कार्यक्रम'? संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडेच? अजित पवार विरुद्ध...

नाना पटोले म्हणले, 40 जागांवरुन वाद

नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना, 40 जागांवरुन वाद सुरु असून तो लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच विदर्भातील 12 जागांवरुन कोणताही वाद नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र या 12 जागा त्या 40 जागांमध्येच आहेत, असं सूचक विधानाही त्यांनी केलं आहे. तसेच 22 ऑक्टोबरला मुंबईतून पक्षाची पहिली यादी जाहीर केली जाईल, असंही पटोले म्हणाले.

नक्की वाचा >> पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'

भायखळ्यातही गोंधळ

भायखळा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि कॅाग्रेस यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक होणार आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेवक रमाकांत राहटे आणि मनोज जामसुदकर इच्छुक आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असा सामना होणार आहे.