महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघ; आदित्य ठाकरेंसमोर ठाकरे यांचंच मोठं चॅलेंज!

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात  भाजप नेत्या शायना एन सी तसेच मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Oct 23, 2024, 09:02 PM IST
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघ; आदित्य ठाकरेंसमोर ठाकरे यांचंच मोठं चॅलेंज! title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय.. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसलीय.. मात्र राज्यात काही हायप्रोफाईल मतदारसंघ आहेत ज्यांच्या निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष लागलंय.. वरळी विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक.. हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. याच वरळी मतदार संघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडें हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजप नेत्या शायना एन सी शिवसेनेच्या  धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. 

वरळी विधानसभा मतदारसंघात बीडीडी चाळी, डिलाईल रोड बीआयटी चाळी, जिजामाता नगर झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा तसंच वरळी सी फेस विभागातील अनेक टोलेजंग टॅावरदेखील आहेत.. त्यामुळे उच्चभ्रू मतदारांची संख्या लक्षणीय आहे...  मुंबईच्या वरळीमधून आदित्य ठाकरे हे आमदार आहे.. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती.. या निवडणुकीत आदित्य ठाकरे तब्बल 67 हजार 424 मतांनी विजयी झाले होते.. आता राजकीय समीकरणं बदललीयत.

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे वरळीतून मैदानात उतरले आहेत. 28 तारखेला संदीप देशपांडे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यावेळी  निवडून आल्यानंतर पुढच्या शंभर दिवसांचा प्रोग्राम तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. वरळीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. धनुष्यबाण चिन्हावर शायना एनसी या निवडणुक लढण्याची शक्यता आहे.  शायना एन.सी. भाजपच्या नेत्या आहेत आणि राजकारणात दीर्घकाळापासून सक्रीय आहेत. व्यवसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत. शायना एन सी यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे शेरीफ होते.