Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्ती राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. या व्यक्तीचे नाव आहे समीर वानखेडे. रामदास आठवले यांच्या RPI च्या तिकीटावर समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईनंतर रिपाइंची नाराजी दूर झालीय. धारावी आणि कलिना या दोन जागांवर रिपाइंची निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिलीय.तसेच महायुतीची पुढील सरकारमध्ये एक विधानपरिषद सदस्यत्व देण्याचे वचनही देण्यात आलय.
धारावी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी वानखेडे इच्छुक आहेत. विशेष म्हणजे महायुतीकडून मुंबईतील कलिना आणि धारावी मतदारसंघाची जागा RPI आठवले गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे धारावीचं तिकीट वानखेडे यांना मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्या इच्छुक आहेत. समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, धारावीची जागा आठवले यांच्या वाट्याला गेल्याने समीर वानखेडे RPI च्या तिकीटावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मित्रपक्षासाठी भाजपने चार जागा सोडल्यात. बडनेरा युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडलं. राष्ट्रीय समाज पक्षाला गंगाखेडची जागा दिली. तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला कलिनाची जागा देण्यात आली आहे.